मलेरिया आणि डेंग्यूसारखी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांना कोरोनाची भिती

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

मलेरियाची लक्षण असणाऱ्या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. हा रोग मच्छरांमुळे होत असला तरी संबंधित रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत डेंग्यू आणि मलेरिया या दुहेरी रोगांनी ग्रासलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले आहे. हे रिपोर्टस चिंताजनक असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू आणि मलेरिया या दुहेरी रोगाची साथ पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. अपोलो रुग्णालयातील डॉ. राजेश चावला यांनी प्रसारमाध्यमांना  दिलेल्या माहितीनुसार, एका 30 वर्षीय रुग्णाला मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले होते. मलेरियाची लक्षण असणाऱ्या रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. हा रोग मच्छरांमुळे होत असला तरी संबंधित रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. केवळ 30 वर्ष वय असूनही कोणताही जटील आजार नसताना संबंधित रुग्णांला जीव गमवावा लागला, ही बाब चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. 

"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"

देशात मागील तीन दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा हा विक्रमीरित्या वाढत आहे. शनिवारी देशाातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा   40.96 लाखच्या पुढे गेला. जगभरातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या देशांच्या यादीत भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारतापाठोपाठ या यादीत ब्राझीलचा क्रमांक लागतो. भारतातील कोरोनाचा कहर ब्राझीलपेक्षाही चिंताजनक झाला आहे. देशात सध्याच्या घडीला सक्रीय रुग्णांचा आकडे एकूण रुग्णांच्या 20.96 टक्के असून या महा साथीच्या रोगातून बरे होण्याचे प्रमाण हे  77.30 टक्के इतके आहे.

भारतीय महिलांबद्दल गलिच्छ वक्तव्य; अमेरिकेच्या माजी अध्यक्षाचा भारतद्वेष...

देशातील कोरोनामुळे मृत पाणाऱ्यांची टक्केवारी ही  1.72 इतकी आहे. शनिवारी कोरोनातून बरे होणाऱ्या आकडेवारीत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले होते. मागील आकडेवारीच्या तुलनेत 77.25 टक्केवरुन हा आकडा 77.30 टक्के इतका नोंदवला गेला होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र राज्याला बसला आहे. मागी 24 तासांत विक्रमी  20 हजार 800 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा हा   8 लाख 83 हजार 862 वर जाऊन पोहचला आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients increasing chances of dengue malaria