Corona Updates: देशात तब्बल 79 लाख रुग्ण कोरोनामुक्त

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 9 November 2020

देशात गेल्या 7 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन 40 ते 50 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत.

नवी दिल्ली: देशात गेल्या 7 दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या प्रतिदिन 40 ते 50 हजार कोरोना रुग्ण वाढत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार 903 रुग्णांचं निदान झालं असून 490 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या 85 लाख 53 हजार 657 झाली असून 1 लाख 26 हजार 611 कोरोना (COVID19) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक, 1 कोटीपेंक्षा जास्त रुग्ण असलेला पहिलाच देश

सध्या देशात कोरोनाच्या 5 लाख 9 हजार 673 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंतच्या बाधितांपैकी 79 लाख 17 हजार 373 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मागील 24 तासांत देशात 48 हजार 405 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

रविवारी देशात कोरोनाच्या 8 लाख 35 हजार 401 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 11 कोटी 85 लाख 72 हजार 192 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

'मी लोकांना तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी काम करणार'

युरोपातही कोरनाची दुसरी लाट आली असून तिथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर अमेरिकेत कोरोनाने मोठा कहर केला आहे. अमेरिकेत मागील 10 दिवसांत 10 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovered cases reaches 79 lakh