esakal | Corona Update - रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग सध्या कमी झाला आहे. तसंच रिकव्हरी रेट चांगला असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. तीन महिन्यांपूर्वी सक्रीय रुग्णांची संख्या दहा लाखांवर होती ती आता साडेतीन लाखांवर आली आहे. 

Corona Update - रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर, नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग सध्या कमी झाला आहे. तसंच रिकव्हरी रेट चांगला असल्यानं सक्रीय रुग्णांचे प्रमाणही कमी आहे. तीन महिन्यांपूर्वी सक्रीय रुग्णांची संख्या दहा लाखांवर होती ती आता साडेतीन लाखांवर आली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे नवे 27 हजार 71 रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत भारतात एकूण 98 लाख 81 हजार 380 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

रविवारी दिवसभरात एकूण 30 हजार 695 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 336 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 43 हजार 352 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 93 लाख 83 हजार 879 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात सक्रीय रुग्णांची संख्या 3 हजार 138 ने कमी झाली आहे. देशात आता एकूण 3 लाख 54 हजार 904 सक्रीय रुग्ण आहेत. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत ही संख्या 3.62 टक्के इतकी आहे. 

हे वाचा - Corona - पुढचे चार ते सहा महिने खूप वाईट असू शकतात; बिल गेट्स यांचा इशारा

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशासह काही राज्यात सक्रीय रुग्ण, मृत्यू दर आणि रिकव्हरी रेट जास्त आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे मृत्यू दर आणि सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत आहे.

गेल्या 16 दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या कमी असून त्यापेक्षा जास्त बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं प्रमाण हे 1.45 टक्के इतकं असून रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

हे वाचा - गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले

सक्रीय रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात आठव्या स्थानावर आहे. तर एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार करता अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. रिकव्हरी होण्याच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येनुसार अमेरिका पहिल्या , ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. युरोपसह जगातील काही देशांनी दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. 

loading image