Corona Update : गेल्या 7 महिन्यातील सर्वांत कमी रुग्णवाढ; सीरमच्या लसीची पहिली खेप देशभर रवाना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

आज मंगळवारी सकाळी सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली गेली आहे.

नवी दिल्ली : आज मंगळवारी सकाळी सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही  लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली गेली आहे. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.  पुणे एअरपोर्टवरुन आठ विमानांद्वारे कोरोना लस देशातील 13 ठिकाणी पाठवली जाईल. पहिले विमान दिल्लीसाठी रवाना होणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

गेल्या 24 तासांत भारतात 12,584 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. गेल्या 7 महिन्यातील ही सर्वाधिक कमी रुग्णवाढ आहे. या नव्या रुग्णांसहित देशातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,04,79,179 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 18,385 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसहित देशातील एकूण आजवरच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,11,294 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 167 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,51,327 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 2,16,558 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा - 'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण

गेल्या 24 तासांत कोरोनाच्या एकूण 8,97,056 चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,26,52,887 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यात काल 2438 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 19,71,552 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात गेल्या 24 तासांत 4286 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,67,988 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 50,101 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात सध्या 52,288 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India 12 January India records lowest spike in 7 months