Corona : भारतात काल 18,711 नवे रुग्ण; महाराष्ट्रात येणार केंद्राची विशेष पथके

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 March 2021

महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राने आता या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथके  पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतात काल 18,711 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत भारतात 14,392 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. काल एका दिवसांत भारतात 100 रुग्ण दगावले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

केंद्राची विशेष पथके

महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राने आता या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथके  पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके आज-उद्या रवाना होतील व संबंधित राज्य सरकारांच्या मदतीने संसर्गाची साथ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतील. ही पथके केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नियमित अहवाल देतील. या पथकात डॉक्‍टर व आरोग्य तज्ज्ञांसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तज्ज्ञांचाही समावेश असेल.

  • आजवरचे एकूण रुग्ण: 1,12,10,799
  • एकूण बरे झालेले रुग्ण: 1,08,68,520
  • एकूण मृत्यू : 1,57,756 
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 1,84,523
  • एकूण लसीकरण: 2,09,22,344

काय आहे महाराष्ट्रातील परिस्थिती?

काल महाराष्ट्र राज्यात 10,187 नवे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात 6,080 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. काल 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  • एकूण रुग्ण: 22,08,586
  • बरे झालेले रुग्ण: 20,62,031
  • एकूण मृत्यू : 52,440
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 92,897

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update India Report 7 march 2021