Corona Update : आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख लसीकरण; गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण

corona update india
corona update india

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या दिवसी म्हणजे कालच्या दिवशी देशात 17 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत देशात एकूण 2.24 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे. 

गेल्या 24 तासांत भारतात 13,788 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,71,773 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 14,457 रुग्णांना डिस्चार्ज दिला  गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,02,11,342 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,52,419 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशातील ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 2,08,012 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 
गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 5,48,168 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 18,70,93,036 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती ही Indian Council of Medical Research ने दिली आहे. 

काल महाराष्ट्रा राज्यात 3081 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 19,90,759 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 2342 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,86,469 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 50,738 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 52,653 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com