esakal | Corona Update : लसीकरणाचा नवा रेकॉर्ड; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

corona

आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

Corona Update : लसीकरणाचा नवा रेकॉर्ड; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,838 नवे रुग्ण आढळले आहेत. काल 13,819 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा राज्यांमध्ये एकूण 85 टक्के रुग्ण संख्या आहे. त्यामुळे या राज्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

  • आजवरचे एकूण रुग्ण : 1,11,73,761
  • एकूण बरे झालेले रुग्ण: 1,08,39,894
  • आजवरचे एकूण मृत्यू : 1,57,548
  • ऍक्टीव्ह रुग्ण: 1,76,319
  • एकूण लसीकरण: 1,80,05,503

काल देशात 7,61,834 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या चाचण्यांची संख्या ही 21,99,40,742 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 

हेही वाचा - कोरोना लसीकरणात भारताचा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल इतक्या लोकांना लस

कोरोना लसीकरणात भारताचा रेकॉर्ड

प्रायव्हेट आणि सरकारी भागिदारीमुळे गुरुवारी लसीकरणाचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. देशात तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. सध्या वयस्कर आणि गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे.

केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन गाईडलाईन्स जारी केले आहेत. जुन्या काही नियमांना कायम ठेवत केंद्र सरकारने मॉल्स, धार्मिक स्थळे आणि रेस्तराँसाठीच्या नव्या दिशानिर्देशांची घोषणा केली. 

हेही वाचा - Corona: मॉल्स, रेस्तराँ आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

हेही वाचा - 'मेट्रो मॅन' श्रीधरन यांच्यावरुन केरळ भाजपात गोंधळ; मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरुन आता घुमजाव
महाराष्ट्र राज्यात काल 8,998 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच काल नवीन 6,135 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,49,484 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 85,144 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.66% झाले आहे.

loading image