Corona Update : गेल्या 24 तासांत 90 जणांचा मृत्यू; राज्यात 95.7% रिकव्हरी रेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,649 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,09,16,589 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 9,489 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,06,21,220 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 90 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,55,732 वर पोहोचली आहे. सध्या देशात 1,39,637 कोरोना रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. भारतात आतापर्यंत 82,85,295 जणांना  लस देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात 4092 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 1355 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1975603 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 35965 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7% झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Report India 15 February 2021