Corona Update : अद्याप 41,38,918 जणांना लस; आकडेवारीत दिलासादायक घट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 11,039 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांस देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही  1,07,77,284 वर पोहोचली आहे. काल 14,225 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,62,631 वर जाऊन पोहोचली आहे. काल 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,596 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशातील एकूण ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ही 1,60,057 आहे. गेल्या 16 जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत अद्याप 41,38,918 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

काल देशात 7,21,121 चाचण्या केल्या गेल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील आजवरच्या एकूण चाचण्यांची संख्या ही 19,84,73,178 वर जाऊन पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) वर पोहोचली आहे. 

काल महाराष्ट्र राज्यात नवे 1927 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 20,30,274 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 4011 लोकांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,36,305 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 51,139 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 41,586 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Report India 3 February 2021