कोरोना बाधितांना अस्पृश्‍यांसारखी वागणूक; सर्वोच्च न्यायालयाची खंत

Supreme-Court
Supreme-Court

नवी दिल्ली - कोरोनाबाधित रुग्णांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात आल्यानंतर त्यांना अस्पृश्‍यांसारखी वागणूक दिली जाते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. यावर केंद्र सरकारने देखील आम्ही हा नियम तयार केलेला नाही तसेच ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला अशा व्यक्तींवर ठपका ठेवण्याचाही आमचा कोणताही उद्देश  नाही असे सांगत लोकांचे संरक्षण करणे हेच आमचे ध्येय असल्याचे नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर.शहा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याबाबत सुनावणी झाली. कोरोनाबाबतची जमिनीवरील स्थिती खूप वेगळी आहे, एकदा कोरोनाबाधितांच्या घरावर तसे पोस्टर चिकटविण्यात आल्यानंतर त्यांना अस्पृश्‍यासारखी वागणूक देण्यात येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राज्ये त्यांची स्वतःची रणनीती राबवीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुन्हा सुनावणी होणार
कोरोनाबाधितांच्या घराबाहेर पोस्टर लावण्यासारख्या पद्धती हद्दपार केल्या जाव्यात, त्यासाठी गाईडलाईन्स तयार करण्याचा विचार केला जावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. याबाबत केंद्राने आपले म्हणणे मांडले असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. केंद्राने सादर केलेले म्हणणे रेकॉर्डवर येऊ द्या त्यानंतर आम्ही गुरुवारी याबाबत सुनावणी घेऊ, असे खंडपीठाने नमूद केले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com