तिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी दिला इशारा

तिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी दिला इशारा

नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. देशात जवळपास चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण दररोज सापडत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता सरकारच्या वैज्ञानिक सल्लागाराने आणखी एक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटलंय की, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवणं अशक्य आहे. डॉ. के विजय राघवन यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, नव्या स्ट्रेनशी लढा देण्यासाठी लस अपडेट करायला हवी. त्यासोबतच लशीकरण मोहिमेला देखील गती द्यायला हवी. भारतामध्ये कोरोना संक्रमणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तसेच मोठ्या संख्येने लोकांचा जीव देखील या दुसऱ्या लाटेमध्ये जात असल्याचं विदारक चित्र आहे.

तिसरी लाट येणार हे निश्चित; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी दिला इशारा
बाबो, केवढी ही गर्दी; गुजरातमध्ये कोरोना नियम धाब्यावर (Video)

पुढे त्यांनी म्हटलंय की, ज्या प्रचंड गतीने हा कोरोना व्हायरस पसरत आहे, ते पाहता कोरोनाचा फेज - 3 अर्थात तिसरा टप्पा टाळला जाऊ शकत नाही, असं चित्र आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट नाहीये की, हा तिसरा टप्पा कधी येणार आहे. मात्र, आपल्याला तिसऱ्या लाटेसंदर्भात सजग रहायला हवं. लशीच्या अपग्रेडेशनवर लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही राज्य सरकारांना माहिती देऊन आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितलं आहे. ब्रिटनच्या व्हेरियंटचा प्रभाव आता कमी होत आहे मात्र नव्या व्हेरियंटचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर भारतात थांबताना दिसत नाहीये. गेल्या 24 तासांत एका दिवसातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. यासोबतच भारतात आतापर्यंत एकूण 2,26,188 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 3,82,315 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या 34,87,229 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. तर देशातील पॉझिटीव्हीटी रेट 24.80% वर गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com