राम मंदिर उभे राहिल्यानंतर कोरोना नष्ट होईल: भाजप खासदार

वृत्तसंस्था
Wednesday, 29 July 2020

राम मंदिर उभे राहिल्यानंतर कोरोना नष्ट होईल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या खासदार जसकौर मीणा यांनी केले आहे.

दौसा (राजस्थान) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावर लस शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण, राम मंदिर उभे राहिल्यानंतर कोरोना नष्ट होईल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या खासदार जसकौर मीणा यांनी केले आहे.

Video: रुग्णालयातून मध्यरात्री येतो किंचाळण्याचा आवाज...

खासदार जसकौर मीणा यांच्या कोरोनाच्या वक्तव्यावर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दरम्यान, जसकौर मीणा यांच्या अगोदर अनेक नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत.

दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेश विधानसभा प्रोटेम स्पीकर रामेश्वर शर्मा म्हणाले होते की, 'राम मंदिर निर्माण सुरू होताच कोरोना व्हायरसचा नष्ट होण्यास सुरुवात होईल. हळूहळू कोरोना संपुष्टात येईल.' पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर निर्माण भूमीपूजन करणार आहेत. 9 नोव्हेंबर 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येचा निकाल दिल्यानंतर राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. तेव्हापासून तयारीला सुरुवात झाली आहे.

'बकरी ईदला कुर्बानी द्यायची असेल तर आपल्या मुलांची द्या'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the corona virus will be destroyed once the ram temple is built now the says bjp mp