कोरोनाच्या सर्व प्रकारांसाठी ‘पेप्टाइड वैक्सीन’; भारतीय शास्त्रज्ञांचा दावा

ही लस आपल्या प्रकारात अद्वितीय आहे
 coronavirus
coronavirus coronavirus

देशात कोरोनाने (Coronavirus) चांगलाच कहर केला. आतापर्यंत तीन लाट आल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात जीव हाणी झाली आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच भारतीय शास्त्रज्ञांनी (Indian scientists claim) अशी लस विकसित केल्याचा दावा केला आहे जी कोरोना विषाणूच्या सर्व प्रकारांवर प्रभावी ठरू शकते. काझी नजरुल युनिव्हर्सिटी, आसनसोल आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, भुवनेश्वरच्या शास्त्रज्ञांनी ‘पेप्टाइड लस’ (Peptide vaccine for all types) विकसित केली आहे. जी भविष्यात कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारापासून संरक्षण करेल, असा दावा केला जात आहे.

शास्त्रज्ञांचे संशोधन जर्नल ऑफ मॉलिक्युलर लिक्विड्सने प्रकाशनासाठी स्वीकारले आहे. संशोधकांनी सांगितले की, यामध्ये आम्ही असे मल्टी-एपिटोप मल्टी-टार्गेट काइमरिक पेप्टाइड विकसित केले आहे जे कोरोना विषाणूच्या (Coronavirus) सर्व सहा सदस्यांविरुद्ध (hCoV-229E, hCoV-HKU1, hCoV-OC43, SARS-CoV, MERS-CoV) प्रतिपिंड तयार करण्यास सक्षम आहे.

 coronavirus
‘चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील’

काझी नजरुल विद्यापीठातील शास्त्रज्ञ चौधरी आणि सुप्रभात मुखर्जी आणि आईआईएसईआर, भुवनेश्वर येथील पार्थ सारथी सेन गुप्ता, सरोज कुमार पांडा आणि मलय कुमार राणा यांनी डिझाइन केलेली लस अत्यंत स्थिर, प्रतिजैविक आणि इम्युनोजेनिक असल्याचे आढळून आले. चौधरी म्हणाले की, संशोधकांच्या चमूने संगणकीय पद्धतीने ही लस विकसित केली आहे. पुढील टप्प्यात या लसीच्या निर्मितीचा समावेश असेल. त्यानंतर त्याची चाचणी सुरू केली जाईल.

ही लस आपल्या प्रकारात अद्वितीय आहे. कोरोना विषाणूच्या (Coronavirus) सर्व प्रकारांचा एकाच वेळी सामना करण्यासाठी जगात कोणतीही लस तयार केलेली नाही. संशोधकांनी यापूर्वी सहा वेगवेगळ्या विषाणूंच्या स्पाइक प्रथिनांमध्ये भिन्न संरक्षित प्रदेश ओळखले होते ज्यात फारच कमी उत्परिवर्तन होते आणि त्यामुळे साथीच्या आजारादरम्यान थोडासा बदल होतो, असे चौधरी (Indian scientists claim) यांनी पीटीआयला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com