esakal | दिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले हजारो नागरिक; आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus delhi nizamuddin tablighi jamaat massive covid 19 cases

कोरोनाविषयी सूचना आणि जनजागृती करूनदेखील तबलीगी जमात आयोजित कशी झाली, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले हजारो नागरिक; आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Coronavirus : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मर्कज मस्जिद हा भारतात कोरोना व्हायरस पसरण्याचा खूप मोठा स्रोत असल्याचं मानलं जात आहे. मर्कज मस्जिदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तबलीगी जमातच्या निमित्ताने देश-विदेशातील नागरिकांनी वास्तव्य केले होते. गेल्या एक महिन्यापासून तेथे जवळपास 8 हजार नागरिकांची ये-जा झाली आहे. अगदी लॉक डाऊनच्या काळात म्हणजेच 26 मार्च रोजीही तेथे जवळपास 2 हजार नागरिक एकत्र आल्याची माहिती असून, इतक्या सूचना आणि जनजागृती करूनदेखील तबलीगी जमात आयोजित कशी झाली, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता या मोठ्या समूहातून देशभर पसरलेला कोरोना व्हायरस रोखायचा कसा? हे मोठं आव्हान देशातील आरोग्य यंत्रणेपुढं उभं राहण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉक डाऊन काळातही आले एकत्र 
कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका असल्यामुळं केंद्रानं दिलेले आदेश धुडकावून दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात मर्कज मस्जिदमध्ये जमातचं आयोजन करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांत तेथे 1 हजार 830 लोक एकत्र आल्याची माहिती आहे. त्यात 281 विदेशी नागरिक आहेत. हे नागरिक 16 वेगवेगळ्या देशांमधून आल्याची माहिती आहे. यातील 200 लोकांना कोरोना झाल्याचा संशय आहे त्यांना कोरोनाची वेगवेगळी लक्षणे दिसली आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना वेगवेगळ्या कोरंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. देशात संपूर्ण लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतरही 16 देशांमधून आलेले 281 जण मर्कज मस्जिदमध्ये वास्तव्यास होते. 

आणखी वाचा - देशात आणीबाणी? लष्करानं दिलं स्पष्टीकरण

कोणत्या देशातून आले?

  • इंडोनेशिया - 72 
  • श्रीलंका - 34
  • म्यानमार - 33
  • किर्गिस्तान - 28 
  • मलेशिया - 20 
  • बांग्लादेश, नेपाळ - प्रत्येकी 9 
  • थायलंड - 7 
  • फिजी - 4 
  • इंग्लंड - 3
  • अफगाणिस्तान, अल्जेरिया, जिबूती, सिंगापूर, फ्रान्स, कुवैत - प्रत्येकी 1 

आणखी वाचा - चार बँका पुढचे तीन महिने हप्ते घेणार नाहीत!

जमातमध्ये आलेल्यांचा मृत्यू
जमातमध्ये सहभागी झालेल्या इंडोनेशियातील सहा जणांचा हैदराबादमध्ये मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली होती. ती व्यक्तीही जमातमध्ये सहभागी झाली होती. त्या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचं नवभारत टाईम्सनं दिलेल्या वृत्तात म्हटलंय. महिनाभरात आठ हजार नागरिकांनी जमातमध्ये सहभाग घेतला होता. ते नागरिक आता ज्या ज्या भागात गेले आहेत तेथे त्यांना कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. यात सर्वाधिक तमीळनाडूतून 501 नागरिक सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशातून 156, महाराष्ट्रातून 109, बिहारमधून 86, बंगालमधून 73, तेलंगणातून 55, कर्नाटकमधून 45, अंदमान निकोबारमधून 21 जण सहभागी झाले होते. 

loading image