कोरोनामुळं हिऱ्याची चकाकीही कमी झाली!

Diamond
Diamond

कोलकता - हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या व्यावसायासाठी गुजरातमधील सूरत शहर जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा थेट फटका सूरतमधील हिऱ्यांच्या उद्योगाला बसू लागला आहे. लॉकडाउन तातडीने मागे घेऊन येथील कामकाज पूर्ववत झाले नाही तर सूरतच्या ‘डायमंड हब’ या ओळखीला तडा जाऊ शकते. वेगाने पावले उचलली नाहीत तर येथील हिऱ्यांचा व्यापार चीन, थायलंड आणि आफ्रिकेतील देशांकडे जाऊ शकतो, असा इशारा डी बीअर्स या जगप्रसिद्ध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुस क्लिव्हर यांनी दिला आहे.

लॉकडाउनचा फटका
लॉकडाउनमुळे सूरतमधील हिऱ्यांवर पैलू पाडण्याचा उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे जगभरात सध्या निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे कच्च्या हिऱ्यांची आयात महिनाभरापासून थांबली आहे. एवढेच नाही तर या व्यावसायात काम करत असलेल्या अनेक स्थलांतरित कामगारांनी सूरत सोडून आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला आहे.

आफ्रिकी देश, चीन स्पर्धेत
सूरत हे हिऱ्यांवर प्रक्रिया करण्यासाठीचे जगातील सर्वांत मोठे केंद्र मानले जाते. सूरत प्रमाणेच चीन, थायलंड आणि आफ्रिकी देशांमध्येही कमी प्रमाणात हे काम चालते. त्यामुळे सूरतमधील हिऱ्यांचा उद्योग लवकर पूर्वपदावर आला नाही तर येथील व्यावसाय चीन, थायलंड किंवा आफ्रिकी देशांकडे जाऊ शकतो.

२०२० कठीण वर्ष

  • डी बीअर्सने २०२०साठीचे उत्पादन उद्धीष्ट ७ ते ९ टक्क्यांनी घटविले
  • भारतातील हिरा उद्योगावरील ताण कमी करण्यासाठी उत्पादन घटविण्याचा निर्णय
  • कच्च्या हिऱ्यांच्या खरेदीमध्येही अधिक सवलती दिल्या जात आहेत
  • आधी आर्थिक मंदीचा तडाखा, आता कोरोना संकटाचा फटका
  • लॉकडाउन हटविण्यात आलेल्या देशांमधून मागणी येण्यास सुरवात
  • २०२० च्या पूर्वार्धानंतर अमेरिकेतील मागणी वाढणार

हिरा है सदा के लिए!

  • ८,००० कोटी रुपये - फेब्रुवारी, मार्चमधील नुकसानीचा अंदाज
  • ५०,००० कोटी रुपये - हॉंगकॉंगला होणारी हिऱ्यांची निर्यात
  • ५०० - सूरतमधील कारखान्यांची संख्या
  • ७ लाख - सूरतमधील हिरा उद्योगातील कामगार
  • ६ लाख - सूरतमधून बाहेर पडलेले कामगार
  • १० डॉलर - सूरतमधील प्रतिकॅरेटसाठीचा प्रक्रिया दर

भारतातील हिरा उद्योग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. मात्र जागतिक व्यापारही महत्त्वाचा आहे. मागणी असेल तर सर्व प्रकारच्या अडथळ्यांवर मात करत ती पूर्ण करावीच लागणार आहे. त्यामुळे पुरवठा साखळी सुरू ठेवणे गरजेचे बनले आहे.
- ब्रुस क्लिव्हर, सीईओ, ‘डी बीअर्स’

हिऱ्यांला पैलू पाडण्यांचे ५०० यूनिट सूरतमध्ये आहेत. मात्र लॉकडाउनमुळे पाच ते सहा लाख कामगारांनी सूरत सोडले आहे. परिणामी, येथील कामकाज जून महिन्यापूर्वी सुरू होणार नाही. कारखाने पुन्हा सुरू करताना सोशल डिस्टंसिंग सारख्या उपायांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. 
- बाबूभाई कथीरिया, अध्यक्ष, सूरत डायमंड असोशिएशन

आमची भूमिका स्पष्ट आहे. जागतिक बाजारात मागणी नसल्याने महिनाभर कच्च्या हिऱ्यांची आयात करणार नाही. त्याचबरोबर पुन्हा कारखाने सुरू करण्यापूर्वी आम्हाला एसओपीचे पालन बंधनकारक आहे. 
- कोलीन शहा, उपाध्यक्ष, जेम अॅंड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउंसिल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com