कोरोनाचं मृत्यू तांडव! 24 तासांत 4,329 रुग्णांचा बळी

कोरोनाचं मृत्यू तांडव! 24 तासांत 4,329 रुग्णांचा बळी

Coronavirus in India, Covid-19, Latest Updates : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Coronavirus In India) कमी होत आहे. पण अद्याप परिस्थिती गंभीर आहे. देशातील काही राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 28 दिवसानंतर देशात सर्वाधिक कमी नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात दोन लाख 63 हजार 533 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत तब्बल चार लाख 22 हजार 436 जणांनी कोरोनावर मात केली. तर चार हजार 329 जणांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरापासानू देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत दोन कोटी 52 लाख 28 हजार 996 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी देशात एक लाख 63 हजार 231 उपाचाराधीन रुग्णात कपात झाली. देशात सध्या 33 लाख 53 हजार 765 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात दोन लाख 78 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आयसीएमआरनं (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 18 कोटी 44 लाख 53 हजार149 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. यामध्ये 15 लाख 10 हजार जणांचं लसीकरण सोमवारी झालं. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 18 लाख 69 हजार 223जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com