esakal | भारतात झपाट्याने वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या; जाणून घ्या सद्यस्थिती!

बोलून बातमी शोधा

Coronavirus_India

महाराष्ट्रात 3.80 लाखांहून अधिक रुग्ण

- पश्चिम बंगालमध्ये 2,134 नव्या रुग्णांची नोंद

भारतात झपाट्याने वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या; जाणून घ्या सद्यस्थिती!
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर बहुतांश व्यवहार सुरु झाले आहेत. त्यानंतर आता देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 14,83,156 वर गेला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली आणि गुजरात या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. सध्या कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 64.2 इतके आहे. तर जागतिक क्रमवारी कोरोनाबाधितांची संख्या 1.68 कोटीवर गेली आहे. तसेच आत्तापर्यंत 6.58 लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'ने (आयसीएमआर) सांगितले, की आत्तापर्यंत 1,77,43,740 नुमन्यांची चाचणी करण्यात आली होती. यापैकी 4,08,855 नमुन्यांची तपासणी काल (मंगळवार) करण्यात आली. 

img

महाराष्ट्रात 3.80 लाखांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात सध्या 3,83,723 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये 1,47,896 ऍक्टिव्ह रुग्ण असून, 2,21,944 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. याशिवाय 13,883 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये 2,134 नव्या रुग्णांची नोंद

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल एका दिवसात 1,449 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच एका दिवसातील एकूण रूग्णसंख्या 2,134 वर गेली आहे. त्यामुळे आता राज्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 62,964 वर गेला आहे. याशिवाय 42,022 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा