इराणमध्ये अफवेमुळं 300 बळी गेल्याची भीती; कोरोना बरा होतो म्हणून, मिथेनॉल प्यायले

coronavirus iran fake news methanol drink 300 fear dead
coronavirus iran fake news methanol drink 300 fear dead

तेहरान Coronavirus :  सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरणाऱ्या फेक न्यूज हा जगभरात चिंतेचा विषय आहे. त्यातच कोरोनोचा सध्या होत असणारा फैलाव आणि त्यात फेक न्यूजची पडत असलेली भर, आरोग्य तंत्रणांची तारांबळ उडवत आहे. अशाच एक फेक न्यूजमुळं इराणमध्ये 300 लोकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो अशी अफवा सोशल मीडियावरून पसरल्यानंतर इराणमधील हजारो नागरिकांनी हे विषारी द्रव्यप्राशन केले. त्यामुळे सुमारे तीनशे लोक मृत्युमुखी पडल्याचे तर हजारहून जास्त जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे धक्कादायक वृत्त आले आहे. कोरोनाची साथ रोखण्यात इराणला झगडावे लागत असून सुमारे दोन हजार चारशे बळी गेले असून ३२ हजारहून जास्त रुग्ण आहेत. औषध मिळविण्यासाठी उतावीळ झालेली अनेक कुटुंब बनावट उपायांचा अवलंब करीत आहेत. यात इराणमध्ये बंदी असलेल्या मद्याचाही समावेश आहे. ब्रिटनमधील इंडिपेंडंट या वृत्तपत्राने आपल्या वेबसाईटवर ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

पाच वर्षांच्या एका मुलाला हे द्रव्य देण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाली असून त्याला श्वसनासाठी कृत्रिम प्राणवायू पुरविण्यात आला आहे. या मुलावरील उपचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोग्य मंत्रालयाला मदत करणाऱ्या एका डॉक्टरने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही दुर्घटना आणखी भीषण असू शकते. मृतांचा आकडा ४८०, तर अत्यवस्थ लोकांचा आकडा दोन हजार ८५० आहे. आरोग्य मंत्रालयाचे सल्लागार डॉ, होसेन हसानीयन यांनी सांगितले की, इतर देशांत एकच नवी साथ आहे. येथे मात्र आम्ही दोन आघाड्यांवर लढतो आहोत. मद्यप्राशनामुळे विषबाधा झालेले आणि कोरोना संसर्ग झालेले अशा दोन प्रकारच्या रुग्णांवर आम्हाला उपचार करावे लागत आहेत.

दरम्यान, खुझेस्तान या ईशान्येकडील प्रांतात गेल्या दोन आठवड्यांत मिथेनॉल विक्री केल्याने अनेकांना अटक करण्यात आली. शिराझ, कराज आणि याझद या शहरांत अनेकांनी मिथेनॉल प्राशन केल्याचे वृत्त आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
इराणच नव्हे, भारतातही कोरोना विषयीच्या अफवांना ऊत आला आहे. सोशल मीडियावर या संदर्भात प्रचंड अफवा पसरत आहे. कोरोनाग्रस्त पेशंटचे नाव प्रसिद्ध करण्याच्या सूचना मीडियाला आहेत. पण, अनेक ठिकाणी मीडियाकडून बातमी प्रसिद्ध होण्याच्या आधीच पेशंटचे नाव, पत्ता प्रसिद्ध केला जात आहे. यामुळं आणिबाणीची परिस्थिती ओढवण्याचा धोका असतो. त्यामुळं खात्रीशीर माहितीच फॉरवर्ड करा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com