लॉकडाऊन काळात गुगल मॅपची खूप मोठी मदत

लॉकडाऊन काळात गुगल मॅपची खूप मोठी मदत

गुगल मॅपवर आता लॉकडाऊन काळात जेवण आणि राहण्याची सोय असलेली केंद्र दिसणार आहेत. कोरोनामुळे देशभरात सरकारकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे देशातील गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. काही परराज्यातील लोकांना तर राहण्यासाठी निवारासुद्धा उपलब्ध झालेला नाही. अशातच गुगलने त्याच्या गुगल मॅपमध्ये एक नवीन फीचर जोडले आहे.  या लोकांना मदत करण्यासाठी गुगलने गुगल मॅपमध्ये एक नवीन वैशिष्ट्य जोडले आहे. हे नवीन वैशिष्ट्य अधिकाधिक लोकांना राज्य आणि केंद्र सरकारच्या साह्याने मदत करणार आहे. हे वैशिष्ट्य लोकांना मदत केंद्रात पोहोचण्यास मदत करेल. गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य सध्या देशातील ३० शहरांमध्ये काम करणार आहे. हे वैशिष्ट्य, गुगल मॅपच्या सर्च आणि असिस्टंटच्या मदतीने लोकांना मदत केंद्रात पोहोचण्यास मदत करणार आहे. अन्न, निवारा किंवा रात्री निवारा शोधण्यासाठी वापरकर्ते टाइप करून किंवा बोलून गुगलला आदेश देऊ शकतात. गुगलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की हे फीचर लवकरच हिंदीमध्ये सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

या फिचरला सोयीस्कर कसे बनवत आहे गुगल?
गुगल सध्या हे वैशिष्ट्य इतर भारतीय भाषांमध्येही उपलब्ध करून देण्याचे काम करीत आहे. तसेच अन्य शहरे गुगल मॅपमध्ये जोडण्याचे काम चालू असून लवकरच तिथे सुद्धा गुगल मॅपची खूप मदत होणार आहे. गुगल इंडियाचे वरिष्ठ प्रोग्राम मॅनेजर अनल घोष म्हणाले की, या क्षणी कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही कनेक्टेड अफोर्टवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरुन त्याद्वारे लोकांच्या गरजा भागवता येतील.

गुगल कशी पुरविणार सेवा
गुगलने नेहमीच लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर लोकांना सुविधा देणारी व्यासपीठ तयार करून त्यांच्या सेवा पुरवणाऱ्या श्रेणीत सुद्धा सुधारणा केली आहे. गुगल मॅपमधील ही वैशिष्ट्ये लोकांना या वैशिष्ट्यांविषयी सहज जागरूक करतील यापद्धतीने हि सुविधा देण्यात येणार आहे. हि सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी गुगल लॉकडाऊनच्या काळात गरिबांना सेवा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच स्वयंसेवक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची मदत घेत आहे. गुगल मॅपच्या या फिचरमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि , माहिती आणि मदत सहज पोहचण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com