देशातील कोरोनाचा कहर थांबता थांबेना; रुग्णांच्या आकड्यात विक्रमी वाढ

coronavirus, covid 19, India
coronavirus, covid 19, India

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाने जगाला हैराण केले आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या या विषाणूने देशात अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासांत कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतची सर्वाधिक नोंद झाली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा पहिल्यांदाच आठ हजारांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,73,763 झाली आहे. शुक्रवारी 7964 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून 265 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4971 झाली आहे. देशात सध्या 86422 कोरोना बाधित उपचार घेत असून 82370 जणांवर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. समाधानाची बाब म्हणजे covid-19 मधून बरे होणाऱ्यांचा दर(रिकव्हरी रेट) 41 टक्यांपर्यंत पोहोचला आहे.

सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आतापर्यंत 62228 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी 33133 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून 26,997 लोकांनी या विषाणूवर यशस्वीरित्या मात केली आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्रात 2098 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनामुळे 116 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी 8381 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच राज्यात कोरोनाग्रस्तांचा बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 43.38 टक्के झाला आहे. तसेच रुग्ण दुपटीचा वेग 15.7 दिवसांवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com