देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे

coronavirus in india, covid-19, latest updates: देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या महितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी 28 हजार 709 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात बहुतांश राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने घटू लागला आहे. त्यामुळे अनलॉक केले जात आहे. देशात आज 50 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या दैनंदिन संसर्गाचा दर 2.67, तर साप्ताहिक दर 3.22 आहे. परंतु महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि केरळमधील काही जिल्ह्यांत हा दर कमी झालेला नाही. त्यामुळे तज्ज्ञ धोक्याचा इशारा देत आहेत. त्यातही निर्बंध शिथिल केल्याने बाजारापेठांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला नसल्याने अशी गर्दी वाढत राहिल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे
....तरच कोरोनाची तिसरी लाट टाळता येईल!

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मंगळवारी 50 हजार 848 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 68 हजार 817 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या तीन कोटींच्या पुढे
‘डेल्टा प्लस’मुळे चिंतेत वाढ; जळगाव, रत्नागिरीला इशारा

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण (Total cases) : 3,00,28,709

एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,89,94,855

एकूण मृत्यू (Death toll) : 3,90,660

एकूण उपचाराधीन रुग्ण (Active cases) : 6,43,194

देशात कोरोनाचा दैनंदिन संसर्गाचा सरासरी दर पाच टक्क्यांपेक्षा खाली आहे. दुसऱ्या लाटेमुळे ठप्प झालेले जनजीवन पूर्ववत करण्यासाठी हे दिलासादायक चित्र असले, तरी विषाणूचे बदलत असलेले रुप हे तिसऱ्या लाटेचा धोका कायम ठेऊन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com