Corona Update : 24 तासांत 39,742 नवे रुग्ण, केरळने चिंता वाढवली

Corona update
Corona update

शुक्रवारी देशात कोरोनाच्या 39 हजार 742 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 535 रुग्णांना जीव गमवावा लागलाय. याच कालावधीत 39 हजार 972 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणावर घटली आहे. मागील 24 तासांत उपचाराधीन रुग्णसंख्येमध्ये 200 पेक्षा जास्त रुग्ण कमी झाले आहेत.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोनाबाधित रुग्ण 3.13 कोटी

उपचाराधीन रुग्ण Active cases: 4,08,212

एकूण करोनामुक्त Total recoveries: 3,05,43,138

एकूण मृत्यू Death toll: 4,20,551

एकूण लसीकरण Total vaccination: 43,31,50,864

देशात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच केरळ राज्याने चिंता वाढवली आहे. मागील 24 तासांत केरळमध्ये 18531 रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 45 टक्के नवे रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com