Corona Update : कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या जास्त

Corona Patient
Corona Patient

Coronavirus in india, covid-19, latest updates : मागील काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त होती. मात्र, आज कोरोनामुक्तांचं प्रमाण नवीन रग्णांपेक्षा कमी आहे. त्यामुळेच उपचाराधीन रुग्णांची संख्य वाढली आहे. त्याशिवाय मृताच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 43 हजार 654 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 640 जणांच्या मत्यूची नोंद करण्यात आली आहे. याच कालावधीत 41 हजार 678 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोनास्थिती -

24 तासांत आढळलेले नवे रुग्ण - 43,654

24 तासांत कोरोनामुक्त झालेले 41,678

24 तासांतील मृत्यू 640

उपचाराधीन रुग्ण - 3,99,436

एकूण कोरोनामुक्त : 3,06,63,147

एकूण मृत्यू : 4,22,022

एकूण लसीकरण - 44,61,56,659

Corona Patient
ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

देशातील 11 राज्यांमध्ये प्रत्येक दिवशी 500 हून जास्त रुग्ण सापडत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मणिपूर, मेघालय आणि मिझोरामचा समावेश आहे. सध्या देशातील 8 राज्यात कडक निर्बंध आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडु, मिझोराम, गोवा, पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. याठिकाणी आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध आहेत.

Corona Patient
ट्रक-बसचा भीषण अपघात; 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com