ब्लॅक फंगसचा दिल्लीत कहर; राजस्थान सरकारचाही मोठा निर्णय

ब्लॅक फंगसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रुग्णांच्या डोळ्यांचेही नुकसान होते. औषधांचे अधिक प्रमाण, मधुमेह आणि अन्य लक्षणांमुळे रुग्णाचा मृत्यू ओढवण्याचा धोका वाढतो.
black fungus
black fungusGoogle file photo
Summary

ब्लॅक फंगसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रुग्णांच्या डोळ्यांचेही नुकसान होते. औषधांचे अधिक प्रमाण, मधुमेह आणि अन्य लक्षणांमुळे रुग्णाचा मृत्यू ओढवण्याचा धोका वाढतो.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असताना आता दिल्लीकरांपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. ब्लॅक फंगसच्या केसेसमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. तसेच एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. दिल्लीतील प्रसिद्ध मूलचंद हॉस्पिटलमधील डॉ. भगवान मंत्री यांनी ही माहिती दिली.

३७ वर्षाय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला ब्लॅक फंगसची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो घरीच उपचार घेत होता. तसेच त्याला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. प्रकृती बिघडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. भगवान यांनी दिली.

black fungus
सरकारचा WhatsAppला इशारा; नवी पॉलिसी मागे घ्या अन्यथा...

मूलचंद हॉस्पिटलव्यतिरिक्त दिल्लीतील अन्य हॉस्पिटलमध्येही ब्लॅक फंगसचे रुग्ण दाखल झाले आहेत. अपोलो हॉस्पिटलमध्ये १०, मॅक्स हॉस्पिटलमध्ये ५०, एम्समध्ये ७५-८० रुग्ण ब्लॅक फंगसवरील उपचार घेत आहेत. मूलचंद हॉस्पिटलमधील ब्लॅक फंगसच्या एकमेव रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

१६ मे रोजी सदर रुग्णाला मूलचंदमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यांना आणि चेहऱ्यावर सूज आली होती. डोळे लाल झाले होते. तसेच नाकातून रक्त वाहत असल्याचेही रुग्णाने सांगितले होते. सर्व चाचण्या केल्यानंतर त्या रुग्णाला ब्लॅक फंगसचे निदान झाले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्याचा मृत्यू झाला.

black fungus
'हिंदूंचा अपमान करणाऱ्यांवर बहिष्कार टाका'

डॉ. भगवान म्हणाले की, ब्लॅक फंगसमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. रुग्णांच्या डोळ्यांचेही नुकसान होते. औषधांचे अधिक प्रमाण, मधुमेह आणि अन्य लक्षणांमुळे रुग्णाचा मृत्यू ओढवण्याचा धोका वाढतो.

दिल्ली व्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांत कमी अधिक प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. बेंगलोरमध्ये गेल्या १५ दिवसांत ७५ नवे रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्येही ब्लॅक फंगसमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे राजस्थान सरकारने ब्लॅक फंगसला महामारी म्हणून घोषित केलं आहे. केंद्र सरकारवर अवलंबून न राहता राज्य सरकारांनी ब्लॅक फंगसशी लढण्यासाठी स्वतंत्र तयारी सुरू केली आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com