Big Breaking : लॉकडाउन 4.0; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

coronavirus pm narendra modi speech for national lockdown 4.0
coronavirus pm narendra modi speech for national lockdown 4.0

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून संवाद साधला. त्यात त्यांनी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के रक्कम या निधीतून देशातील वेगवेगळ्या घटकाला सपोर्ट मिळेल. देशातील उद्योग क्षेत्राला विशेषतः लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना याचा फायदा होईल, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली. देशातील कामगार, मध्यमवर्ग यांना याचा मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत' विषयी माहिती दिली जाईल.

कोरोनाशी संबंधित देशभरातली घडामोडींसाठी येथे क्लिक करा

दरम्यान, आपल्या निवेदनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन 4ची घोषणा केली. पण, 17 मेनंतर किती तारखेपर्यंत लॉकडाउन असेल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 17 मेपूर्वी या संदर्भात घोषणा केली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  

कोरोनाशी संबंधित जगभरातील घडामोडींसाठी येथे क्लिक करा

भारताला आत्मनिर्भर बनवणारे पाच स्तंभ

  • अर्थव्यवस्था
  • पायाभूत सुविधा 
  • भारतीय व्यवस्था
  • लोकशाही 
  • मागणी

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • आत्मनिर्भर भारत हेच आपले उद्दिष्ट्य आहे.
  • आपत्ती ही संधी असते हे भारतानं पुन्हा एकदा दाखवू दिलं 
  • एन-95 मास्कचं उत्पादन भारतात नाममात्र होत होतं 
  • 2 लाख पीपीई कीट आणि एन-95 मास्क रोज भारतात तयार होत आहेत
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com