Coronavirus : रेपो रेटमध्ये कपात; तर कर्जाच्या हफ्त्यांनाही आणखी तीन महिन्याची मुदतवाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शक्तिकांत दास यांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी पत्रकार परिषद आहे. याआधी त्यांनी 27 मार्च रोजी आणि 17 एप्रिल रोजी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या.

मुंबई : कर्जावरील व्याजदरात (रेपो रेट) रिझर्व्ह बॅंकेने कपात केली असून हा दर आता चार 4.40 टक्क्यांवरून चार टक्के करण्यात आला आहे. तसेच, कर्जावरील हप्ते भरण्यात आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांतील हप्ते न भरण्याची सवलत ग्राहक घेऊ शकतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ही सवलत वर्किंग कॅपिटल, टर्म लोन आणि होमलोनसाठीही मिळू शकते. ही सवलत आधीच्या तीन महिन्यांतही देण्यात आली होती. दरम्यान, रेपो रेट कमी करण्याच्या निर्णयामुळे बॅंकांना आणखी स्वस्त कर्जपुरवठा होणार आहे. या आधी घेतलेल्या निर्णयात हा रेट पाऊन टक्क्यांनी कमी करण्यात आला होता.
--------
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
--------
विमानप्रवासासाठी मार्गदर्शक सूची जाहीर; सेतू ऐपविषयी महत्वाची घोषणा
--------
दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर
--------
चार दिवसांचा वर्कवीक करा; कंपन्यांना सल्ला
--------
दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यांच्याकडून कोणत्या घोषणा होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना त्यांनी या घोषणा केल्या आहेत. कोरोना-कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शक्तिकांत दास यांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी पत्रकार परिषद आहे. याआधी त्यांनी 27 मार्च रोजी आणि 17 एप्रिल रोजी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. गेल्या मार्चमध्ये त्यांनी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. पण कोविडचे संकट गंभीर रूप धारण करीत असल्याने नागरिकांना कर्जाचे हप्ते भरणे अवघड जात आहे. त्याची दखल घेत त्यांनी हा निर्णय घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus : RBI extends the moratorium period by 3 months

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: