esakal | चिंताजनक : देशभरात पसरतो कोरोना; परदेशी पर्यटकांना अनेक ठिकाणी बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update five people affected Kerala 41all over india

कोरोनाच्या उद्रेकानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे.

चिंताजनक : देशभरात पसरतो कोरोना; परदेशी पर्यटकांना अनेक ठिकाणी बंदी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : जगभरातील अन्य देशांप्रमाणेच भारतामध्येही कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने सरकार आणि आरोग्य यंत्रणेने आता युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरवात केली आहे. केरळमध्ये आज आणखी पाच जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने देशभरातील बाधितांची संख्या ४१ वर पोचली आहे. या विषाणूंच्या प्रसाराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अरुणाचल प्रदेशने परकीय पर्यटकांसाठी राज्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळमधील बाधित पाचपैकी दोघांनी याआधीच इटलीला भेट दिली होती, त्यांच्यामध्ये तापासारखी लक्षणे आढळून आल्यानंतरही त्यांनी याची माहिती स्थानिक आरोग्य यंत्रणेला दिली नव्हती, असे केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी सांगितले. कोरोनाची लागण झालेले हे सर्वच जण एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. कतारहून कोचीला आलेल्या एका प्रवाशाला या विषाणूची बाधा झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर तेथील यंत्रणेनेही भारताशी संपर्क साधायला सुरवात केली आहे. राजधानी दिल्लीत या विषाणूच्या प्रसाराचा वेग सर्वाधिक असून, शहरातील २५ रुग्णालयांमध्ये १६८ वेगळे बेड या रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्येही वैद्यकीय संशोधक (एनआयव्ही) नमुन्याच्या चाचण्या घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.

आणखी वाचा - या देशातल्या महिला आहेत सगळ्यांत जास्त जाड

शरद पवारांकडून दखल 
कोरोनाच्या उद्रेकानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी तातडीने तेथील भारतीयांच्या समस्यांची दखल घेत त्यांना वैद्यकीय आणि इतर मदत पुरवावी, असे पवार यांनी म्हटले आहे. इराणमधील कोम शहरात चाळीस भारतीय नागरिक अडकून पडले आहेत.

आणखी वाचा - भारतासह 80 देशांमध्ये पसरलाय कोरोना

देशभरात काय घडले?

  • दिल्लीत बस, मेट्रोचे निर्जंतुकीकरण 
  • चुकीच्या माहितीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तीवर अरुणाचलमध्ये गुन्हा 
  • तमिळनाडूत कोरोनाचा एक रुग्ण सापडला 
  • केरळमध्ये पाच वेगळी नियंत्रण कक्षे सुरू 
  • एअरटेलकडून कोरोनाबाबत जाणीव जागृती 

आणखी वाचा - आता काश्मीरमध्येही घुसला कोरोना; वाचा कोठे काय परिस्थिती

भारत- म्यानमार सीमा बंद करण्याची मागणी 
ऐजॉल : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारत- म्यानमार सीमा बंद करण्यात यावी, अशी मागणी मिझोराम प्रदेश काँग्रेस समितीकडून करण्यात आली आहे. मिझोरामला लागून म्यानमारची सीमा ही ५१० किलोमीटर एवढी आहे. सीमेवरील छाम्पाई जिल्हा तातडीने बंद केला जावा, असे काँग्रेसने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 

loading image