'प्रचारसभेत हसण्याची नव्हे तर लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ'

लोकांचे जीवन महत्वाचे आहे की तुमची आकडेवारी आणि सरकारची प्रतिमा असा सवाल करत प्रियांका गांधींनी हल्लाबोल केला.
'प्रचारसभेत हसण्याची नव्हे तर लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ'
Summary

लोकांचे जीवन महत्वाचे आहे की तुमची आकडेवारी आणि सरकारची प्रतिमा असा सवाल करत प्रियांका गांधींनी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की, देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सरकारकडून करण्यात आलेली वक्तव्ये ही खूपच निराशाजनक अशी आहेत. एएनआयशी बोलताना त्यांनी म्हटलं की, सध्या पंतप्रधान प्रचार करतात. ही वेळ प्रचाराची नाही तर लोकांचे अश्रू पुसण्याची आणि जनतेला कोरोनापासून वाचवण्याची आहे. मोदींनी राजकीय सभांमध्ये हसण्याची ही वेळ आहे का असा प्रश्नही प्रियांका गांधींनी विचारला. सध्या काँग्रेस पक्ष गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी आजही प्रचारामध्येच व्यग्र आहेत. ते सभांमध्ये हसत खेळत सहभागी झालेले दिसतात. लोक रडत आहेत, मदतीची याचना करत आहेत. ऑक्सिजन, बेड, औषधं मागत आहेत आणि तुम्ही मोठ मोठ्या सभांमध्ये जात आहात. तिथं हसत हसत भाषण देताय. तुम्ही असं कसं करु शकता? असे प्रश्न प्रियांका गांधी यांनी विचारले आहेत.

'प्रचारसभेत हसण्याची नव्हे तर लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ'
कोरोनाचा उद्रेक! 24 तासात जवळपास 3 लाख रुग्ण, 2000 मृत्यू

देशात ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता ही जगात सर्वात मोठी आहे. तरीही त्याचा तुटवडा कसा काय? 8 - 9 महिने आधी सीरो सर्व्हेतून दुसऱ्या लाटेचा इशारा मिळाला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं. तुमच्याकडे वेळ होता. भारतात आज फक्त 2000 ट्रक ऑक्सिजन वाहून नेऊ शकतात. ऑक्सिजन उपलब्ध आहे मात्र तो जिथं गरज आहे तिथं पोहोचवता येत नाहीय हे दुर्दैव म्हणावं लागेल. गेल्या सहा महिन्यात 11 लाख रेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्यात करण्यात आली. आज आपल्याकडे तुटवडा असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियांका गांधी यांनी म्हटलं की, सरकारने 6 कोटी लशींची जानेवारी मार्च या कालावधीत निर्यात केली. यावेळी 3 ते 4 कोटी भारतीयांना लस देण्यात आली होती. भारतीयांना प्राधान्य का नाही दिलं? नियोजनातील गोंधळामुळे लशीची कमतरता, रेमडेसिव्हिरचा तुटवडा आणि काहीच आराखडा तयार नसल्यानं ऑक्सिजन उपलब्ध नाही. सरकारचं हे अपयश आहे.

'प्रचारसभेत हसण्याची नव्हे तर लोकांचे अश्रू पुसण्याची वेळ'
रेमडेसिव्हिर स्वस्त होणार; आयात शुल्क हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सीरो सर्वेनुसार 5 कोटी लोक कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचं म्हटलं होतं. चाचण्या वेगानं वाढवण्याची शिफारसही करण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारने 70 टक्के अँटिजेन टेस्ट सुरु केली होती. याचाच अर्थ फक्त 30 टक्के आरटी पीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. चाचण्या का वाढवल्या नाहीत? अँटिजेन टेस्ट का? त्यांची संख्या कमी करण्यासाठी का? आजही अहवाल येत आहे की खासगी लॅबमध्ये चाचण्या बंद करण्यासाठी सांगतायत. कारण काय? लोकांचे जीवन महत्वाचे आहे की तुमची आकडेवारी आणि सरकारची प्रतिमा असा सवाल करत प्रियांका गांधींनी हल्लाबोल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com