
कोविड-१९ ला रोखण्यासाठी हात सतत धुणे हा सर्वोत्तम उपायांपैकी एक मानला जातो. परंतु दुर्देवाने अनेक देशात हात धुण्याबाबत पुरेशी सुविधा उपलब्ध दिसून येत नाही. त्या देशात आरोग्य सुविधा देखील मर्यादित स्वरुपात आहेत.
- मायकेल ब्राउएर, आयएचएमइचे प्राध्यापक
नवी दिल्ली - सध्या कोविडच्या प्रसारामुळे संपूर्ण जग हादरलेले असताना त्यापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टिन्सिंगवर भर दिला जात आहे. मास्कचा वापर आणि हात वारंवार धुवत राहणे हा त्यावर उपाय असला तरी जगातील एकूण लोकसंख्येच्या एक चर्तुथांश लोकसंख्येकडे हात धुण्यासाठी पुरेसे पाणी आणि साबण नसल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याप्रमाणे भारतातील पाच कोटीहून अधिक नागरिकांकडे हात धुण्याची योग्य सुविधा नसल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याचा किंवा त्यांच्यापासून प्रसार होण्याचा धोका अधिक असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स ॲड इव्हॅल्यूशन (आयएचएमई) च्या संशोधकाने म्हटले की, कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशातील एकूण दोन अब्जहून अधिक जणांकडे साबण आणि स्वच्छ पाणी नाही. त्यामुळे विकसित देशांच्या तुलनेत या ठिकाणी कोरोनाचा फैलाव अधिक होण्याची शक्यता असून ही संख्या एकूण लोकसंख्येच्या एक चर्तुथांश आहे.
लडाख सीमारेषेवरील तणावपूर्ण परिस्थीतीवर भारताकडून स्पष्टीकरण
1) ‘एन्वायरमेंटल हेल्थ पर्सपेक्टिव्ज’ मध्ये प्रकाशित संशोधनानुसार आफ्रिकेतील सहाराप्रवण भाग आणि ओशिनिया देशातील ५० टक्क्याहून अधिक नागरिकांकडे हात धुण्याची पुरेशी सुविधा नाही.
2) जगातील ४६ देशात निम्म्याहून अधिक लोकांकडे हात धुण्यासाठी पाणी आणि साबण नाही
दरवर्षी सात लाख नागरिकांचा मृत्यू
कोविडचा फैलाव होत असताना हँड सॅनिटायझर ही तात्पुरती सोय आहे. परंतु कोविडपासून कायम दूर राहण्यासाठी दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे. एरव्ही अस्वच्छतेमुळे जगभरात नागरिकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याप्रमाणे जगात हात धुण्याची योग्य सुविधा नसल्याने दरवर्षी ७,००,००० लोकांचा मृत्यू होतो.
हात धुण्याची सोय नाही
भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, इथोपिया, कांगो, इंडोनेशिया या देशात प्रत्येकी पाच कोटीहून अधिक नागरिकांकडे हात धुण्याची चांगली किंवा पुरेशी सोय नाही.