कुंभमेळ्यात खादीला भरारी

कुंभमेळ्यात खादीला भरारी

प्रयागराज : कुंभमेळ्यात सुव्यवस्था राखून भाविकांना खूष करणाऱ्या राज्य सरकारने या मेळ्यात खादीचाही जोरदार प्रचार केला आहे. या कुंभमेळ्यात सरकारच्या खादी ग्रामोद्योग विभागाने भरविलेल्या मोठ्या प्रदर्शनातून आतापर्यंत जवळपास आठ कोटी रुपयांची विक्री झाली आहे.

या प्रदर्शनात नागालॅंड, पश्‍चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, जम्मू-काश्‍मीर आणि राजस्थानसह इतरही राज्यांमधून आलेल्या संस्थांनी खादीचे जवळपास 250 स्टॉल उभारले आहेत. मोठी सवलत देत हे स्टॉलधारक भाविकांना आकर्षून घेत आहेत. या प्रदर्शनातून 5.75 कोटी रुपयांची खादी, तर 2.10 कोटी रुपयांच्या इतर वस्तूंची विक्री झाली आहे. 

"स्पिक मॅके' उद्या संपणार 

कुंभमेळ्यानिमित्त 17 जानेवारीपासून येथे संगमावर सुरू असलेला "स्पिक मॅके शास्त्रीय संगीत आणि नृत्य' मालिका 24 फेब्रुवारीला संपणार आहे. 26 दिवसांच्या या मालिकेत आतापर्यंत पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. बिरजू महाराज, बेगम परवीन सुलताना, पं. राजन मिश्रा, पं. साजन मिश्रा, पं. विश्‍वमोहन भट, डॉ. प्रभा अत्रे यांच्यासह एकूण 240 दिग्गज कलाकारांनी कला सादर केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com