देशाला भाजपपासून मुक्ती हवी : अखिलेश यादव

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

''देशाला भाजपपासून मुक्ती हवी आहे. भाजपने निवडणुकांपूर्वी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी सरकारने देशातील कोणत्याही नागरिकाच्या बँक खात्यामध्ये अद्यापही 15 लाख रुपये जमा केलेले नाहीत''.

- अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

कानपूर : भाजपमध्ये सध्या गोंधळ निर्माण झाला असून, घराणेशाही पुढे आली आहेत. देशाला भाजपपासून मुक्ती हवी आहे. भाजपने दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी सरकारने देशातील कोणत्याही नागरिकाच्या बँक खात्यामध्ये अद्यापही 15 लाख रुपये जमा केलेले नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

Akhilesh

'अमर उजाला संवाद' या कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान अखिलेश यादव बोलत होते. ते म्हणाले, ''उत्तर प्रदेश सरकारने दिल्ली सरकारपेक्षा चांगले काम केले आहे. तरीदेखील ते आम्हाला स्थानिक पक्ष म्हणून संबोधतात''. घराणेशाहीवर बोलताना ते म्हणाले, ''मी डिंपल यादवला निवडणूक लढविण्यास मनाई केली. त्यामुळे आता भाजपनेही घराणेशाही बंद करायला हवी. जर घराणेशाही नसती तर मठाची खुर्ची मिळालीच नसती. तसेच आम्ही जातीच्या आधारे कधी मते मागितली नाहीत. मात्र, भाजपचे लोक होळी आणि रमजानच्या नावावर मते मागतात'', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.   

''देशाला भाजपपासून मुक्ती हवी आहे. भाजपने निवडणुकांपूर्वी दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. मोदी सरकारने देशातील कोणत्याही नागरिकाच्या बँक खात्यामध्ये अद्यापही 15 लाख रुपये जमा केलेले नाहीत'', असेही अखिलेश म्हणाले.

Web Title: Country want to BJP Free Country Says Samajwadi Party Chief Akhilesh Yadav