मोदींच्या नेतृत्वात देशाला योग्य सन्मान मिळेल : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मे 2019

- 24 तासांत 18 तास काम करणारे नेतृत्त्व म्हणजे नरेंद्र मोदी. 

नवी दिल्ली : 'प्रचारावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, एनडीएतील घटक पक्षांनी भाजपवर विश्वास दाखवला. त्यानंतर आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता स्थापन होत आहे. देशातील जनतेने पूर्ण आशेने मोदींवर विश्वास ठेवला. गुजरातमध्ये झालेल्या विकासानंतर देशातील जनतेने हे केले. जनतेने जो प्रयोग केला तो यशस्वी झाला. पुन्हा एकदा देशातील जनतेने मोदी, एनडीएला विश्वास दाखवत संधी दिली. हा अभूतपूर्व मताधिक्य मिळाला आहे,' अशी प्रतिक्रीया अमित शहा यांनी व्यक्त केली.  

देशाच्या जनतेने दाखवलेला विश्वास मोदींनी सार्थ ठरवला. गरिबांचा आशेचा आशीर्वाद म्हणजे नरेंद्र मोदी आहे. मोदींनी देशभरात दौरा केला. मोदींची एक प्रकारे त्सुनामी होती. देशातील प्रत्येक घटकांपर्यंत योजना पोहोचवल्या. त्यांनी एकदाही सुट्टी घेतली नाही. 24 तासांत 18 तास काम करणारे नेतृत्त्व म्हणजे नरेंद्र मोदी, असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड

नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ससंदीय नेतेपदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. एनडीएतील विविध घटक पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निवडीला पाठिंबा दिला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The country will get a good respect by the leadership of Modi says Amit Shah