विज्ञान, कौशल्यातूनच देश पुढे जाईल - धनकर

कोलकता - विज्ञान महोत्सवात प्रस्थापित करण्यात आलेल्या तीन गिनेस विक्रमांच्या प्रमाणपत्रांसोबत (डावीकडून) डॉ. विजय भटकर, राज्यपाल जगदीप धनकर आणि त्यांच्या पत्नी आणि डॉ. हर्षवर्धन.
कोलकता - विज्ञान महोत्सवात प्रस्थापित करण्यात आलेल्या तीन गिनेस विक्रमांच्या प्रमाणपत्रांसोबत (डावीकडून) डॉ. विजय भटकर, राज्यपाल जगदीप धनकर आणि त्यांच्या पत्नी आणि डॉ. हर्षवर्धन.

कोलकता - पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची सांगता शुक्रवारी झाली. सांगता समारंभाला राज्यपाल जगदीप धनकर, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, विज्ञान भारतीचे अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. विजय भटकर आदी उपस्थित होते.

धनकर म्हणाले, ‘‘हा देश फक्त विज्ञान आणि कौशल्यातून पुढे जाईल. इतके महत्त्वपूर्ण आयोजन कोलकत्यात झाल्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो.’’  डॉ. हर्षवर्धन म्हणाले, ‘‘शेतकरी, कामगार, दिव्यांग, महिला, शिक्षकांपासून वरिष्ठ वैज्ञानिकांपर्यंत सर्वांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला. २०३० पर्यंत देशाला पहिल्या दोन-तीन क्रमांकाच्या वैज्ञानिक देशांत नेण्याचा सरकारचा संकल्प आहे.’’ डॉ. भटकर म्हणाले, की विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नवी दृष्टी देण्याचे काम या महोत्सवाने केले. विज्ञान ही लोकचळवळ बनण्यासाठी हा महोत्सव सुरू झाला आहे. 

बहिष्कार खेदजनक
पश्‍चिम बंगालमध्ये पाहिल्यांदाच आयोजित आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा राष्ट्रीय गौरवाचा विषय आहे. जगभरातील विज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावलेल्या या उत्सवावर राज्य सरकारने आणि प्रशासनाने बहिष्कार टाकण्याचे काही कारणच नाही. राज्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या महोत्सवावर बहिष्कार करणे खेदजनक आहे, असे मत धनकर यांनी आज व्यक्त केले.

राजभवनात आयोजित अनौपचारिक भेटीत त्यांनी ‘सकाळ’सह निवडक माध्यमांशी संवाद साधला. महोत्सवाचे आयोजन, राज्य सरकारची सध्याची मानसिकता, केंद्र सरकारच्या योजनांवर पश्‍चिम बंगाल सरकारने घातलेला बहिष्कार यावर त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले, ‘‘विज्ञानाला जनमानसात रुजवण्यासाठी अशा महोत्सवांची आवश्‍यकता आहे. देशातील प्रत्येक खासदार आपल्या मतदारसंघातून विद्यार्थी आणि शिक्षकांना या महोत्सवासाठी पाठवू शकत होता. या उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर विज्ञान प्रसार होईल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com