देशातील धान्योत्पादनात ३७ लाख टनांनी वाढ

२०२१-२२ मध्ये ३१.४५ कोटी टन एवढे विक्रमी धान्योत्पादन होईल
Grain
GrainSakal

नवी दिल्ली - सरकारने धान्योत्पादनाचा तिसरा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार २०२१-२२ मध्ये ३१.४५ कोटी टन एवढे विक्रमी धान्योत्पादन होईल. मागील वर्षाच्या तुलनेत ३७ लाख टनांची वाढ असेल.

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांमधील सरासरीच्या तुलनेत २०२१-२२ मधील ३१.४५ कोटी टन धान्योत्पादन २.३८ कोटी टनांनी जास्त आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत तांदळाचे उत्पादन १.३२ कोटी टनांनी, तर गव्हाचे उत्पादन २५.३ लाख टनांनी वाढले. धान्योत्पादनाचा तपशील (आकडे कोटी टन) ः तांदूळ १२.९६ (विक्रमी), गहू १०.६४, भरड धान्य ५.०७, मका ३.२१८ (विक्रमी), कडधान्ये २.७७ (विक्रमी), हरभरा १.३९८ (विक्रमी), तेलबिया ३.८५ (विक्रमी), भुईमूग १.००९, सोयाबीन १.३८३, मोहरी १.१७५ (विक्रमी), ऊस ४३.०५ (विक्रमी) तूर ४३.५ लाख टन, कापूस ३.१५४ कोटी गासड्या (प्रतिगासडी १७० किलोग्रॅम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com