प्रेमी युगलांना एकांतात पकडायचे अन् बलात्कार करायचे...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

प्रेमी युगल एकांतात बसण्यासाठी जंगलात आले की त्यांना पकडायचे. पैसे काढून घ्यायचे अन् युवतीवर बलात्कार करायचे.

बैतूल (मध्यप्रदेश): प्रमी युगल एकांतात बसण्यासाठी जंगलात आले की त्यांना पकडायचे. पैसे काढून घ्यायचे अन् युवतीवर बलात्कार करायचे. बदनामी होईल म्हणून तक्रार कोणी करत नव्हते. मात्र, एका युवतीने तक्रार केली अन् टोळी गजाआड झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा सप्टेंबर रोजी एका युवतीने तक्रार दाखल केली होती. पीडित युवती आपल्या प्रियकरासोबत एकांतात बसण्यासाठी चिखलार जंगलामध्ये गेली होती. यावेळी चौघे आले व त्यांनी दोघांना वेगवेगळे करत मारहाण केली व युवतीवर अत्याचार केला. युवतीने अज्ञात युवकांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर तपास करण्यात आला. तपासादरम्यान अमर उईके, गजानंद उईके, मंगल उईके, संतोष उर्फ गब्बू धुर्वे, मनीष उईके, दिलीप उर्फ संतोष तथा गोलू उर्फ जगदीश यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संशयित आरोपींनी सांगितले की, 'प्रेमी युगल एकांतात बसण्यासाठी जंगलामध्ये येत. यावेळी आम्ही पाळत ठेवून त्यांचे मोबाईलमध्ये छायाचित्रे काढायचो व व्हिडिओ तयार करायचो. त्यांच्याकडील पैसे काढून घेतल्यानंतर युवतींवर अत्याचार करायचो. अनेक युवतींवर अत्याचार केला आहे.'

पोलिस निरीक्षक राजेंद्र धुर्वे यांनी सांगितले की, 'अनेक प्रेमी युगल बदनामी पोटी तक्रार दाखल करत नव्हते. मात्र, एका युवतीने तक्रार केल्यामुळे तपास करता आला व टोळीला अटक करण्यात यश आले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: couple loot and rapist gang busted in madhya pradesh