कथुआ रेप केसमध्ये कोर्टाचा अजब निर्णय, चौकशी करणाऱ्या टीमवरच कारवाई

Court orders Jammu police to file FIR against SIT members for torturing witnesses
Court orders Jammu police to file FIR against SIT members for torturing witnesses

श्रीनगर : कथुआ रेप केस प्रकरणात न्यायलयाने अजब निर्णय दिला आहे. साक्षीदारांचा शारीरिक छळ केल्याच्या आरोपात SIT टीमच्या सदस्यांवर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

खोटे पुरावे सादर करणे, बनावट साक्षीदार तयार करणे, विशिष्ट साक्ष देण्यासाठी साक्षीदाराला गैरन्यायालयीन प्रकारे कोठडीत ठेवणे, त्यांचा शारीरिक छळ करणे असे आरोप करण्यात आले आहेत. काश्मीर शहर न्यायालयाच्या न्यायाधिशांनी हा निर्णय दिला आहे.

कथुआ प्रकरणात 2018 साली एका 8 वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात सगळीकडून संतापाची लाट उसळली होती. तत्कालीन पीडिपी आणि भाजप सरकारकडून या SIT ची स्थापना करण्यात आली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com