मुझफ्फरपूर (बिहार) : 'द ऍक्सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खेर यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुझफ्फरनगरमधील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या चित्रपटात सार्वजनिक क्षेत्रांतील व्यक्तींचा अवमान केल्याचा दावा ऍड. सुधीर कुमार ओझा यांनी याचिकेत केला होता. उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे या याचिकेची आज सुनावणी झाली.
खेर यांच्याशिवाय अभिनेता अक्षय खन्ना याचेही नाव याचिकेत आहे. आज न्यायालयाने खेर यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसने यापूर्वीच या चित्रपटाला विरोध केलेला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.