भाजप कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेलला शिक्षा

Court Pronounces Hardik Patel Guilty
Court Pronounces Hardik Patel Guilty

अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला आज (बुधवार) भारतीय जनता पक्षाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी वीसनगरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्याला दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून, त्याने भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या प्रकरणात हर्दिक पटेलसोबत लालजी पटेल आणि एके पटेल यांनाही न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगरमध्ये 23 जुलै 2015 रोजी भाजपा आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. हे प्रकरण पाटीदार समाजाच्या आंदोलनावेळी सुरु झाले होते. या प्रकरणात हार्दिक पटेलसोबत 17 लोकांवर आरोप होता. परंतु, त्यामधील 14 लोकांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

न्यायालयाने कलम 120/ब, 435, 427, 143, 147, 148 अन्वये या तिघांना दोषी ठरवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com