गुप्ता यांच्याबाबतचा निर्णय राखून ठेवला

पीटीआय
शनिवार, 7 जानेवारी 2017

सीबीआय आणि या प्रकरणातील आरोपी गुप्ता, दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. समरिआ, कमल स्पॉंग स्टील ऍण्ड पॉवर लि.चे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया आणि चार्टर्ड अकाउंटन्ट अमित गोयल यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी आपला निर्णय राखून ठेवले.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता आणि अन्य पाच जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील आपला निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सात फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला.

सीबीआय आणि या प्रकरणातील आरोपी गुप्ता, दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. समरिआ, कमल स्पॉंग स्टील ऍण्ड पॉवर लि.चे व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया आणि चार्टर्ड अकाउंटन्ट अमित गोयल यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी आपला निर्णय राखून ठेवले. या गैरव्यवहाराच्या वेळी क्रोफा हे कोळसा मंत्रालयात संयुक्त सचिव, तर समरिया हे कोळसा खाण वाटपाच्या विभागाचे संचालक होते. एखादा लोकसेवक या प्रकारच्या कोळसा गैरव्यवहारात अडकल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. मध्य प्रदेशातील थेसगोरा बी रुद्रपुरी कोळसा खाण गैरव्यवहाराचे हे प्रकरण आहे.
 

Web Title: Court reserves order in coal scam case against ex-coal secretary Gupta