कृषिमंत्र्यांना काळे फासा अन्‌ पाच लाख मिळवा

पीटीआय
सोमवार, 4 जून 2018

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्टंटबाजी असे संबोधणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या तोंडास काळे फासणाऱ्याला पाच लाख रुपयांचा इनाम देऊ, अशी घोषणा "ओबीसी, एससी, एसटी एकता मंच'ने केली आहे.

अहमदाबाद : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला स्टंटबाजी असे संबोधणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या तोंडास काळे फासणाऱ्याला पाच लाख रुपयांचा इनाम देऊ, अशी घोषणा "ओबीसी, एससी, एसटी एकता मंच'ने केली आहे. कॉंग्रेस नेते अल्पेश ठाकोर हे या संघटनेचे नेतृत्व करतात. संघटनेचे समन्वयक मुकेश भारवाद म्हणाले की, ""आम्ही कृषिमंत्र्यांविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत.

शेतकरी त्याच्या हितासाठी आंदोलन करत असून स्वत:वरील अन्याय दूर व्हावा म्हणून तो भांडतो आहे. आपले कृषिमंत्री मात्र त्यांच्या आंदोलनाची टिंगलटवाळी करत आहेत.'' दरम्यान, गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाचा परिणाम दिसू लागला असून, प्रमुख बाजारपेठांमधील भाज्यांचे भाव वाढू लागले आहेत.

Web Title: cover black on agriculture minister and get five lakh