राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत वाढ; नव्या 500 रुग्णांची भर

प्रशासनाने घाबरून न जाता खबरदार घेण्याचे आवाहन केलं आहे.
Covid Vaccination
Covid Vaccinationsakal

मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होतं आहे. आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 501 नवीन रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी दर 7.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1729 आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने घाबरून न जाता खबरदार घेण्याचे आवाहन केलं आहे.

जानेवारीनंतर आज हा सर्वाधिक संसर्गाचा दर नोंदवला गेला आहे. सध्या दिल्लीत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1729 आहे. ही मार्चनंतरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीत कोरोना संसर्गामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या राजधानीत 1729 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच रुग्णांमध्ये वाढ झाल्याने, होम क्वारंटाईनची संख्याहीवाढली आह

Covid Vaccination
अमरनाथ यात्रेसाठी 'TRF'कडून धमकी, सरकार राजकारण करत असल्याचा आरोप

देशासह राज्यातील कोरोना रुग्णांमध्येही वाढ सुरुच आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 59 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 78 लाख 75 हजार 904 वर पोहोचली. तर, दिल्लीत गेल्या 24 तासांत 501 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 290 बरे झाले असून गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.

कोरोनामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 827 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी 127 कोरोना प्रकरणे नोंदवली गेली. राज्यात कोरोनाची लागण होऊन आतापर्यंत 77 लाख 27 हजार 443 लोक बरे झाले असून 634 रुग्ण उपचार घेत आहेत. सिंधुदुर्ग, जळगाव, नंदुरबार, जालना, हिंगोली, उस्मानाबाद, वाशीम, यवतमाळ, भंडारा, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात एकही सक्रिय रुग्ण नाही. सोमवारी मुंबईत 43 नवीन रुग्ण आढळले आहेत. या वाढीमुळे आता पुन्हा एकदा लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Covid Vaccination
खिचडी, लाडू, पराठा; कुपोषण विरोधात लढ्याचा गडचिरोली पॅटर्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com