Coronavirus Vaccination : सफाई कर्मचाऱ्याला देण्यात आली कोरोनाची पहिली लस

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 January 2021

जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पहिल्या टप्प्यात दिल्ली व महाराष्ट्रासह १६ राज्यांतील लाखो डॉक्‍टर व आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : ''अवघा देश ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज आला आहे. कोरोना महामारीवरील देशव्यापीलसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ झाला. जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पहिल्या टप्प्यात दिल्ली व महाराष्ट्रासह १६ राज्यांतील लाखो डॉक्‍टर व आरोग्य सेवकांना लसीकरण करण्यात येणार आहे

मुंबईतील AIIMS हॉस्पिटलमधील सफाई कर्मचाऱ्याला कोव्हिड 19 ची पहिली लस देण्यात आली

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यावेळी उपस्थित होते.  

  पंतप्रधान मोदी यांच्या भाषण Live Updates
- लस लावल्यानंतर मास्क वापरणे, हात धूणे गरजेचे 
- एवढ्या व्यापक स्वरुपात कोणीच लसीकरण मोहीम केली नाही. 

- जगात 100 हून अधिक देश आहेत ज्यांची लोकसंख्या 3 करोड पेक्षा कमी आहे आणि भारतात पहिल्या टप्प्यात 3 करोड लोकांसाठी लसीकरण मोहीम राबवित आहे.

- आपल्याला हा आकडा 30 करोड पर्यंत पोहचवयाचा आहे.
-  खूप दिवसांपासून कोरोना लसीची प्रतीक्षा होती 
-  सर्वात मोठ्या लसीकरणाचा मुंबईतून शुभारंभ

- प्रथम कोरोना युद्धांना लस दिली जाणार
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सरकार उचलणार

- भारतात २३०० कोरोना टेस्टिंग लॅब सुरु 
- कोरोना युद्धांच्या बलिदानाला माझा सलाम

- भारतानं योग्य वेळी योग्य निर्णय घेतलं 
- अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा त्याग मोठा 

 

- बलिदान देणाऱ्या कोरोना योद्धांच्या आठवणीने PM मोदी भावूक

 

- अर्थव्यवस्थेपेक्षा लोकांच्या जीवाला प्राधान्य दिलं 
- कोरोनाचा पहिला रुग्ण मिळण्याआधीच पावलं​

 

- पहिल्या टप्प्यात एका व्यक्तीस १४ दिवसांच्या अंतराने दोनदा लसीकरण करण्यात येणार आहे. 
- कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्‍सिन या दोन लशींचा लसीकरणासाठी वापर करण्यात येईल. जी लस सुरवातीला देण्यात येईल तीच लस त्या व्यक्तीस दुसऱ्याही टप्प्यात येईल.
-  गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना तसेच १८ वर्षांच्या आतील मुलांना सुरवातीला लसीकरण करू नये असेही सांगण्यात आले आहे. 
- कोरोनामुक्त झालेल्यांना आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांतून घरी पाठविल्यावर ४ ते ८ आठवड्यांनी लसीकरण करावे असेही केंद्राच्या निर्देशांत म्हटले आहे.  

- लस घेतल्यावर काही जणांना इंजेक्‍शन घेतलेल्या ठिकाणी हलकी वेदना होणे, डोके दुखणे व उलटी होण्याचा व थकव्याचा त्रास जाणवू शकतो असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. पहिल्यांदा डोस दिल्यावर काही जणांना त्याचे दुष्परिणाम जाणवले तर संबंधितांची सर्व माहिती त्वरित केंद्राकडे कळवावी असेही निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. 

 

आयोगाचा डेटा दिमतीला 
लसीकरणासाठी मतदार याद्यांचा वापर करण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे मात्र लसीकरण पूर्ण झाल्यावर संबंधित आरोग्य अधिकाऱ्याने तो डेटा त्वरित डिलीट करावा असे बंधन आयोगाकडून घालण्यात आले आहे. 

मोहिमेची व्याप्ती 
३००६ - लसीकरण केंद्रे 
१०० जणांना - पहिल्यांदा लसीकरण 
२०० ते २९५ रुपये  - सवलतीमधील लशींची किंमत 
१ कोटी ६५ लाख रुपये - किमतीच्या लशी राज्यांकडे रवाना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 19 Coronavirus Vaccination Inauguration Today 16 January 2020 PM Narendra Modi Speech Live Updates India Maharashtra