esakal | सावधान ! तज्ज्ञ म्हणतायत कोरोना केवळ फुफ्फुसांवर नाही तर याही अवयवांवर करतोय हल्ला...
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान ! तज्ज्ञ म्हणतायत कोरोना केवळ फुफ्फुसांवर नाही तर याही अवयवांवर करतोय हल्ला...

डॉ. गुलेरिया म्हणालेत की, कोरोना हा एक मोठा आजार नाही. सुरवातीला आम्हाला कोरोना एक नयमोनिया सारखा आजार वाटत होता.

सावधान ! तज्ज्ञ म्हणतायत कोरोना केवळ फुफ्फुसांवर नाही तर याही अवयवांवर करतोय हल्ला...

sakal_logo
By
सुमित बागुल

नवी दिल्ली : कोरोनाच्या आकडेवारीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतात कोविड रग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतेय. दिवसाला २५ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याचीही भारतात नोंद आहे. जसाजसा कोरोना फोफावतोय तशीतशी कोरोनाबाबत नवीन माहिती समोर येतेय. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्‍थान म्हणजेच AIIMS चे संस्थापक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाबाबत एक धक्कादायक खुलला केलाय. गुलेरिया यांच्या माहितीप्रमाणे कोरोना केवळ आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करत नाही तर कोरोनामुळे आपल्या हृदयावर, मेंदूवर आणि किडणीवर देखील परिणाम होत असल्याची माहिती समोर येतेय.

BIG NEWS कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा 

डॉ. गुलेरिया म्हणालेत की, कोरोना हा एक मोठा आजार नाही. सुरवातीला आम्हाला कोरोना एक नयमोनिया सारखा आजार वाटत होता. त्यानंतर अनेकांच्या रक्तामध्ये गुठळ्या झाल्यात. परिणामी हृदय आणि फुफ्फुस बंद झाल्याचं निदर्शनास आलं. आता कोरोना मानवी शरीराच्या इतर भागांवर परिणाम करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा आजार मेंदूवरही हल्ला करतो असं निदर्शनास येतंय. 

एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना गुलेरिया म्हणालेत कोरोना आता 'सिस्टेमिक डिसीज' झालाय. याचा अर्थ एखादा आजार जेंव्हा एकापेक्षा अनेक मानवी अवयवांवर हल्ला करतो तेंव्हा त्याला 'सिस्टेमिक डिसीज' असं म्हणतात.

BIG NEWS मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

सोबतच ते म्हणालेत की, आम्ही अशाही काही केसेस पाहिल्यात ज्यामध्ये कोरोनामधून बरं झाल्यानंतरही काही रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवावं लागतंय. कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेकांना तब्बल ३ महिन्यांपर्यंत फुफ्फुसांचा त्रास होतो. रुग्णांच्या सीटी स्कॅनमध्ये ही बाब निदर्शनास आली आहे. अशा रुग्णांना पुढील काही दिवस ऑक्सिजन सपोर्टवर ठेवावं लागतंय. डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे अनेक जण कोरोनानंतर घराबाहेर पडण्यास किंवा ऑफिसला जाण्यास घाबरत असल्याचं ही समोर आलंय. 

covid 19 has now become systemic disease means it attacks or harms more than one organ

loading image