पहिला रुग्ण ते लसीकरणाची 'ड्राय रन'; भारतात कसा पसरला कोरोना?

टीम ई सकाळ
Tuesday, 5 January 2021

भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये आढळला. त्यानंतर वर्षभरात देशाताली प्रत्येक भागात कोरोना पोहोचला.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये आढळला. त्यानंतर वर्षभरात देशाताली प्रत्येक भागात कोरोना पोहोचला. याकाळात लोकांना वाचवणाऱ्यांचे प्राण गेले. स्थलांतरीतांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे आले. वृद्धांना मायेचा हात दिला. किराणा माल, घरात लागणाऱे साहित्य पुरवण्यात आलं. जितकी जमेल तितकी मदत प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला. 

जानेवारी महिन्यात देशात फक्त एकच रुग्ण होता तर फेब्रुवारी अखेरपर्यंत 2 रुग्णांची नोंद होत होती. पुढच्या महिन्यात मात्र कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडेही वाढत चालले होते. 

COVID cases from January to December 2020

आकडेवारी आणि आलेख पाहिले तर लक्षात येईल की सप्टेंबरमध्ये सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण होतं. भारतात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 26 लाख 21 हजार 418 रुग्ण आढळले होते. 

हे वाचा - लशीवरुन राजकारणः काँग्रेस नेते म्हणाले, आधी PM मोदी आणि भाजप नेत्यांनी लस घ्यावी

सरकारसह तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं होतं की, हिवाळ्याच्या दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल. पण सप्टेंबरनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली. 2020 च्या अखेरच्या महिन्यात देशात 8 लाख 3 हजार 865 नवीन रुग्ण सापडले. 

COVID related deaths from January to December 2020

देशात कोरोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं होतं. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक कोरोनामुळे देशात मृत्यू झाले. 33 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

हे वाचा - भारतात जगातील सर्वात मोठी Covid 19 लसीकरण मोहीम - PM नरेंद्र मोदी

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसऱ्या बाजुला सरकारकडून चाचण्यांची संख्या वाढवली जात नसल्याचंही म्हटलं जात होतं. त्यानंतर टेस्ट किटबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं. पण हळूहळू भारतात चाचण्यांची संख्या वाढली आणि कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाणही वाढले. 

Tests conducted per thousand people

सप्टेंबर महिन्यात 1 हजार चाचण्यांपैकी 54 जणांची चाचणी होत होती. डिसेंबरमध्ये हेच प्रमाण दुप्पट होऊन 1 हजार लोकांमागे 125 जणांची चाचणी दरदिवशी व्हायला लागली.

हे वाचा - महाराष्ट्रात पोहोचला कोरोनाचा नवा स्ट्रेन; मुंबई, पुण्यात आढळले रुग्ण

भारतात दोन महिने संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. तरीही देशात आरोग्य यंत्रणा उभी करण्यामध्ये सरकारला अपयश आलं. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले. 

जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनावर लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. मात्र अद्याप भारतात लस मंजुरीच्या प्रक्रियेत अकली आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर ड्राय रन सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 india first patient to vaccination dry run know timeline