Covid update: कोरोना वाढतोय; देशात 24 तासांमध्ये 918 नवे रुग्ण; चार जणांचा मृत्यू

Coronavirus
Coronavirusesakal

भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी देशात कोरोनाच्या 435 रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता 6350 वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहिती नुसार आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 530806 झाली असून मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. तर कोरोनामुळे राजस्थानमध्ये दोघांचा तर कर्नाटक आणि केरळमध्ये एक-एक मृत्यू झाला आहे. अत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 46 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. तर आत्ता पर्यंत 98.80 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या 44159182 वर पोहोचली आहे.

Coronavirus
PM Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा? पुण्यासह औरंगाबादमध्ये ईडीचे छापे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Coronavirus
Sanjay Raut : राऊतांनी फोटो ट्वीट केलेल्या पीडित मुलीसोबत काय घडलं? 

भारतात देखील गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा असं आवाहन काही दिवसांपूर्वी निती आयोगाच्या वतीने करण्यात आलं आहे. इन्फ्लूएंझाचा H3N2 विषाणू देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियाणामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे.

या संसर्गापासून बचाव करण्यासाठी निती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना मास्क घालण्यास सांगितले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात या संसर्गाची ३ हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com