VIDEO-बापरे! कोरोनाबाधिताचा मृतदेह दफनासाठी नेला तब्बल पाचशे मीटर ओढत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेहासोबत अत्यंत निर्दयीपणे वागणूक करण्यात आली आहे.

बंगळुरु : कोरोनासारख्या महामारीने जगभर थैयमान घातले आहे. भारतातही रूग्णांची संख्या तब्बल चार लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचेही प्रमाण जास्त आहे. परंतु, काही ठिकाणी या मृतदेहासोबत निर्दयीपणाची वागणूक होत असल्याचे समोर आले आहे. नुकतीच कर्नाटकातील यादगीर येथे अशीच एक भयानक घटना घडली याहे. कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेहासोबत अत्यंत निर्दयीपणे वागणूक करण्यात आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यापूर्वी तो सुमारे पाचशे मीटर ओढत नेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.

हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामध्ये पीपीई किट परिधान केलेले दोन वैद्यकीय कर्मचारी मृतदेह खेचत घेऊन जाताना दिसत  आहेत. प्रत्यक्षात गावकऱ्यांनी त्यांच्या गावात मृतदेह पुरण्यास नकार दिल्यानंतर वैद्यकीय कर्मचारी मृतदेह घेऊन गावाच्या बाहेरील भागात गेले. परंतु, त्यांनी मृतदेहांसोबत वाईट वागणूक केली. या घटनेनंतर डी. एम. कुलराम राव यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.

 

 

 

हे पण वाचा - धक्कादायक : विषारी नाग पकडायचा, त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागताच माणसांच्या गर्दीत सोडायचा...

 

चौकशीचे आदेश
आजच्या घटनेपूर्वीही असाच एक व्हिडिओ बेल्लारी येथून समोर आला होता. एकामागून एक 8 कोरोना पीडितांचे मृतदेह खड्ड्यात फेकण्यात आले होते. या सर्व घटनानंतर बेल्लारीचे उपायुक्त एस. एस. नकुला यांनी  चौकशीचे आदेश दिले आहेत. मी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असून त्याची दखल घेतली आहे. “आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत,” असे त्यांनी म्हंटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID19 patients dead bodies were treated in Karnataka kolhapur