
IIM Ahmedabad: गायींपेक्षा कुत्र्यांवर देणगीदारांचे अधिक प्रेम; IIM-अहमदाबादच्या अभ्यासातून आलं समोर
IIM Ahmedabad: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) ने ऑनलाइन देणगी पद्धतींवर केलेल्या अभ्यासानुसार, गायींना जास्त देणगीदार मिळतात, परंतु कुत्रे देणगीच्या रूपात जास्त पैसे कमावतात.
गायींच्या संगोपनासाठी ठराविक रक्कम देणगी देणाऱ्यांचे मोठे ग्रुप असतात, पण एक लहान ग्रुप कुत्र्यांच्या संगोपनासाठी गायींच्या देणगीच्या तुलनेत 2 ते 2.5 पट जास्त देणगी देतो.
प्रोफेसर सौरव बोराह, आयआयएम-ए मधील मार्केटिंगचे सहाय्यक प्राध्यापक, त्यांचे डॉक्टरेट विद्यार्थी साई सिद्धार्थ व्हीके यांच्यासह, भारताच्या संदर्भात ऑनलाइन देणग्यांवर संशोधन केले आहे. संशोधकांनी सांगितले कुत्र्यांसाठी देणगी देणाऱ्यांची संख्या शहरी भागात जास्त आहे.
'प्राण्यांच्या कल्याणासाठी लोक उदार हस्ते देणगी देतात'
एकंदरीत, लोक प्राणी कल्याण किंवा प्राण्यांच्या हक्कांसाठी उदारतेने देणगी देताना तर, सरासरी वैयक्तिक देणगी सुमारे 1,000 रुपये होती, तर प्राण्यांसाठी सरासरी देणगी रुपये 1,600 किंवा 60% अधिक असल्याचे आढळले.
त्यांच्याकडे इतर देणगीदारांच्या तुलनेत अधिक निष्ठावंत किंवा नियमित देणगीदार असल्याचेही आढळून आले.
“कोविड-19 किंवा पूर किंवा त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी व्यक्तींच्या देणगीचे स्वरुप समजून घेण्यासाठी आम्ही भारतात क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवरील डेटाचे विश्लेषण केले. ठराविक कालावधीत एकूण 50,000 देणग्या देण्यात आल्या," असे प्रोफेसर बोराह यांनी सांगितले.
“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अनेसृक नियमित देणगीदार होते ज्यांनी विविध कारणांसाठी देणगी दिली. परंतु प्राणी दान करणारे बहुतेकदा प्राणी कल्याणाशी संबंधित होते. किंबहुना, आपत्तीच्या काळात देणगीत वाढ नोंदवली जायची.
ऑनलाइन देणगीदार एका वर्षात सरासरी तीन ते चार देणग्या देतात, नैसर्गिक आपत्तींच्या वेळी देणगीमध्ये वाढ होते" असे साई सिद्धार्थ यांनी सांगितले.
साई सिद्धार्थ म्हणाले की, गायींच्या संगोपनासाठी देणगी देणाऱ्यांना कृतज्ञता म्हणून गायीच्या शेणापासून बनवलेले दिवे आणि बालशिक्षणावरील दिनदर्शिका पाठवण्यात आली.
संशोधकांनी सांगितले की, देणगीदार मुलांच्या शिक्षणापासून ते अन्न सहाय्यापर्यंत अनेक कारणांसाठी पैसे देतात. संशोधकांनी देणगीदारांच्या वागणुकीचे अनेक पैलू अधोरेखित केले, लोक धार्मिकतेकडे झुकलेले तसेच करुणा आणि समाजातील उपेक्षित घटकांप्रती जबाबदारीची भावना त्यांच्यामध्ये आहे.