हैदराबाद एन्काऊंटर करणारा हाच तो अधिकारी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

सीपी सज्जनार हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी यापूर्वी 2008मध्ये वरंगळ येथे झालेल्या ऍसिड हल्ल्यातील आरोपींचादेखील असाच खात्मा केला होता. तसेच आज पहाटे तीन वाजता त्यांनी दिशा केसमधील चारही आरोपींचा एन्काऊंटर करत देशाला नवी 'दिशा' मिळवून दिला आहे. 

चटनपल्ली : हैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्यात आल्याची घृणास्पद घटना आठवड्याभरापूर्वी घडवली होती. या प्रकरणातील चारही आरोपींचा आज हैदराबाद पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. या एन्काऊंटरमधील प्रमुख पोलिस आयुक्त व्हीसी सज्जनार यांचा हा धाडसी निर्णय होता. त्यांच्या या निर्णयामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे तर त्यांचे आभारही मानले जात आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्हीसी सज्जनार हे एन्काऊंटर स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी यापूर्वी 2008मध्ये वरंगळ येथे झालेल्या ऍसिड हल्ल्यातील आरोपींचादेखील असाच खात्मा केला होता. तसेच आज पहाटे तीन वाजता त्यांनी दिशा केसमधील चारही आरोपींचा एन्काऊंटर करत देशाला नवी 'दिशा' मिळवून दिला आहे. 

Image result for vc sajjanar

या चारही आरोपींनी ज्या ठिकणी हैदराबाद बलात्कार प्रकरणातील पीडितेवर बलात्कार केला होता त्याठिकाणी त्यांना घटनास्थळाची पुर्नबांधणी करण्यासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हाच प्रयत्न थांबविताना व्हीसी सज्जनार यांनी त्यांचा एन्काऊंटर केला.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा त्याचजागी एन्काऊंटर

कोण आहेत व्हीसी सज्जनार?
व्हीसी सज्जनार हे 1996च्या आयपीएस बॅचचे आहेत 
सज्जनार यांनी मार्च 2018मध्ये सायबराबादच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली 
महिला आणि मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची दिली होती ग्वाही
एन्काऊंर स्पेशलिस्ट म्हणून, सज्जनार यांची आंध्र प्रदेश, तेलंगणमध्ये ओळख 

सज्जनार तरुणींचे हिरो
आंध्र प्रदेशातील वरंगळमध्ये एका इंजिनीअरिंगच्या तरुणीवर तिघा तरुणांनी अॅसिड हल्ला केला होता. त्यांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केल्यानंतर सज्जनार प्रकाशझोतात आले होते. त्या एन्काऊंटरवरूनही मोठे वाद उफाळून आले होते. पोलिस कायदा हातात घेत असल्याची टीका सच्चनार यांच्यावर झाली होती. पण, नागरिकांकडून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळाला होता. तरुणींसाठी ते हिरोच ठरले होते. त्या एन्काउंटरनंतर संबंधित तरुणीच्या कॉलेज परिसरात फटाके आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला होता. संबंधित तरुणीच्या मैत्रिणीनींनी सज्जनार यांची भेट घेऊन त्यान पुष्पगुच्छ दिले होते. मिठाई भेट दिली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CP Sajjanar mastermind of hyderabad rape case accuseds encounter