'जमात'चे दोन डझनहून अधिक संशयित दहशतवादी ताब्यात

'जमात'चे दोन डझनहून अधिक संशयित दहशतवादी ताब्यात

जम्मू : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून दक्षता बाळगली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने जम्मू काश्मीर फ्रंटचा प्रमुख यसिन मलिक आणि जमात-ए-इस्लामी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल हमीद फयाज याच्यासह दोन डझनहून अधिक संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. 

केंद्र सरकारकडून दहशतवाद्यांविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राने सुरक्षा दलातील 100 अतिरिक्त कंपन्यांना पाचारण करण्याचे आदेश दिले आहेत. या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यात ही कारवाई करत अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्व दहशतवाद्यांचा जमात-ए-इस्लामीशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

22 आणि 23 फेब्रुवारीदरम्यान पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांकडून अटक आणि छापेमारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये केंद्र आणि जिल्हा पातळीवरील संशयितांना ताब्यात घेण्यात आले. 

दरम्यान, या कारवाईबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com