Delhi Elections : दिल बहलता है मेरा... "आप" के आजाने से....

Tuesday, 11 February 2020

निवडणूक प्रचारा काळात अरविंद केजरीवाल यांनी टीव्ही चॅनेल्सला अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. पण, एका मुलाखतीत अँकरने त्यांना हनुमान चालिसाँ माहिती आहे का? असा प्रश्न केला. त्यावर केजरीवाल यांनी होय असे उत्तर दिले आणि अँकरने ऐकवाल का? असे विचारल्यानंतर केजरीवाल यांनी संपूर्ण हनुमान चालिसाँ म्हटली. भाजपने त्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका करायला केली. 

नवी दिल्ली : संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपचा एकतर्फी पराभव करत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पुन्हा दिल्लीचे तख्त जिंकले. आम आदमी पक्षाचा  हा तिसरा विजय असून, अरविंज केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे.  मंगळवारी सकाळपासून मतमोजणीला सरुवात होताच सोशल मीडियावर आम आदमी पक्षावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अशात सोशल मीडियावर नेटिझन्सकडून अरविंद केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाचे नाव वापरून वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. नेटिझन्सची ही सर्जनशीलता अनेकांना हसण्यास बाध्य करत होती.

दिल्लीची निवडणूक सुरुवातीला एकतर्फी वाटत होती. नागरिकांमधून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत होता. पण, हळूहळू या निवडणुकीला रंग चढत गेला. हा सामना केजरीवाल विरुद्ध भाजप असाच होता. त्यात केजरीवाल यांच्या हनुमान भक्तीची निवडणुकीत जोरदार चर्चा झाली.  

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया 

'बिजली, सडक, पानी' याला धरून आम आदमी पक्षाने शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात भरीव कामगिरी केली होती. ही कामे घेऊनच मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीतील मतदारांपुढे गेले होते. त्याला खूप सकारात्मक परिणाम त्यांना दिसला. अखेर विजयश्री खेचून आणण्यात "आप"ला यश मिळाले अन् सुरू झाला सोशल मीडियावर धुमाकूळ.

एका नेटिझनने फेसबुकवर "आप"की जित बेमिसाल असा उल्लेख केला तर एकाने "दिल बहलता है मेरा "आप"के आजाने से" या गाण्याच्या ओळी शेअर केल्या. 
एक व्यक्ती तर "भाजपाने स्कुटी देने का वादे किया था, लेकीन दिल्लीवालोने विश्वास नही किया" अशी पोस्ट केली.
काहींनी व्हॉट्स अॅप स्टेट्स ठेवून "दिल्लीकरांची झाडूवाल्याला पसंती" असल्याचे नमूद केले. एका व्यक्तीने तर कमालच केली. "दिल दिया है जान भी देंगे केजरीवाल तेरे लिए", असा उल्लेख केला. एका व्यक्तीने तर भावनेच्या भरात "माझ्या लग्नात जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद केजरीवालांच्या विजयाने झाल्याचे सांगितले.

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

निवडणूक प्रचारा काळात अरविंद केजरीवाल यांनी टीव्ही चॅनेल्सला अनेक मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. पण, एका मुलाखतीत अँकरने त्यांना हनुमान चालिसाँ माहिती आहे का? असा प्रश्न केला. त्यावर केजरीवाल यांनी होय असे उत्तर दिले आणि अँकरने ऐकवाल का? असे विचारल्यानंतर केजरीवाल यांनी संपूर्ण हनुमान चालिसाँ म्हटली. भाजपने त्यावरून केजरीवाल यांच्यावर टीका करायला केली. 

केजरीवालांची कन्या चर्चेत
शाहीन बाग आंदोलना कपिल बैंसला या तरुणाने गोळीबार केला होता. त्याचे आम आदमी पार्टीशी कथित संबंध असल्यामुळे त्यावरून भाजपने केजरीवाल यांना दहशतवादी असे म्हणायला सुरुवात केली. त्याच दरम्यान, हनुमान चालिसाँ आणि केजरीवाल यांची मुलगी हर्षिता हिचे वक्तव्य चर्चेत आले. माझ्या वडिलांनी मला गीत शिकवली, आता हा दहशतवाद आहे का? असा प्रश्न हर्षिताने केजरीवालांवरील टीकाकारांना विचारला. हर्षिताने या वर्षी विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: creative celebration on social media